आर्थिक

SBI Pension Loan : वयाच्या 60 व्या वर्षीही मिळेल कर्ज, बघा कोणती बँक देतेय?

Published by
Renuka Pawar

SBI Pension Loan : तुम्हाला माहिती असेलच 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना कर्ज मिळणे अवघड आहे. पण SBI ही अशी बँक आहे जी काही खास अटींसह वृद्धांसाठी विशेष योजना चालवते. याअंतर्गत त्यांना कर्ज मिळून जाते. मात्र, हे कर्ज घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना काही अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे. आज आपण त्याबद्दलच जाणून घेणार आहोत.

बँकेची ही योजना पेन्शन कर्ज योजना म्हणून ओळखली जाते. मात्र हे कर्ज मिळवण्यासाठी ज्येष्ठांना काही अटींची पूर्तता करावी लागते. चला या कर्ज योजनेबद्दल सविस्तर जाणून घेऊया…

पेन्शनधारकांना दिले जाणारे हे कर्ज एक प्रकारचे वैयक्तिक कर्जच आहे. जर तुमचे वय 60 वर्षे किंवा त्याहून अधिक असल्यास आणि तुमचे घर बांधण्याचा विचार करत असाल किंवा तुमच्या मुलांच्या लग्नाचा खर्च उचलावा लागत असेल, तर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाकडून हे वैयक्तिक कर्ज घेऊ शकता. परंतु या पेन्शन कर्जाअंतर्गत तुम्हाला मिळणाऱ्या पेन्शननुसारच कर्ज दिले जाईल.

तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडियाकडून कर्ज घ्यायचे असेल आणि तुमचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला या अटी पूर्ण कराव्या लागतील. जर तुम्हाला पेन्शन लोन घ्यायचे असेल तर कर्जदाराचा पेन्शन पेमेंट ऑर्डर स्टेट बँक ऑफ इंडियाकडे असणे आवश्यक आहे. हे कर्ज फक्त तेच लोक घेऊ शकतात ज्यांचे वय 76 वर्षांपेक्षा कमी आहे.

तुम्ही हे कर्ज घेतल्यास, तुम्हाला ते 72 महिन्यांत म्हणजेच 6 वर्षांच्या आत ते फेडावे लागते. तसेच हे कर्ज तुम्हाला वयाच्या 78 वर्षापूर्वी फेडावे लागते. कर्जासाठी अर्जदाराला लिखित स्वरूपात द्यावे लागेल की तो कोषागाराला दिलेल्या त्याच्या आदेशात सुधारणा करणार नाही. याशिवाय तुमच्या जोडीदाराची किंवा कोणत्याही तृतीय पक्षाची हमी असल्यास हे कर्ज तुम्हाला दिले जाते.

याशिवाय इतर काही अटी आणि शर्ती आहेत, त्या पूर्ण केल्यास तुम्हाला कर्ज मिळते. तुम्ही पेन्शन लोन घेतल्यास तुम्हाला अनेक फायदेही मिळतात. त्याचा पहिला फायदा म्हणजे त्याची प्रक्रिया शुल्क इतर कर्जांपेक्षा खूपच कमी आहे. हे सुरक्षित कर्ज मानले जात असल्याने ते सहज उपलब्ध आहे. हे कर्ज घेण्यासाठी तुम्हाला जास्त कागदपत्रे देण्याची गरज नाही. याशिवाय, हे पेन्शन कर्ज वैयक्तिक कर्जापेक्षा स्वस्त आहे.

हे कर्ज घेण्यासाठी तुम्हाला जास्त कागदपत्रे देण्याची गरज नाही. याशिवाय, हे पेन्शन कर्ज वैयक्तिक कर्जापेक्षा स्वस्त आहे. SBI च्या कोणत्याही शाखेत पेन्शन कर्जासाठी अर्ज केला जाऊ शकतो. तुम्हाला या कर्जाविषयी अधिक माहिती मिळवायची असेल, तर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट https://sbi.co.in/ वर जाऊन संपूर्ण माहिती मिळवू शकता.

याबाबत तुम्हाला टोल फ्री क्रमांकावर कॉल करूनही माहिती मिळेल. स्टेट बँक ऑफ इंडियाने टोल फ्री क्रमांकही जारी केला आहे. जर तुम्हाला या पेन्शन कर्जाबाबत काही संभ्रम किंवा प्रश्न असतील तर तुम्ही टोल फ्री नंबर (1800-11-2211) वर कॉल करून संबंधित संपूर्ण माहिती मिळवू शकता आणि कर्जासाठी अर्ज करू शकता.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar