आर्थिक

BOB Fd Scheme: करा बँक ऑफ बडोदामध्ये एफडी आणि मिळवा भरघोस परतावा! लॉन्च केली विशेष एफडी योजना

Published by
Ajay Patil

BOB Fd Scheme:- गुंतवणूक ही भविष्यातील आर्थिक समृद्धी किंवा आर्थिक मजबुतीच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची बाब असून आपण जो काही पैसा कमावतो व त्या कमावलेल्या पैशांची बचत करून त्या बचतीची योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे खूप गरजेचे असते.

त्यामुळे गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार अनेक उपलब्ध असलेल्या गुंतवणूक पर्यायांचा विचार करतात. काही गुंतवणूकदार विविध बँकातील एफडी योजनांमध्ये एफडी करतात किंवा पोस्ट ऑफिसच्या देखील अनेक गुंतवणुक योजना आहेत यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जाते.

थोडी जोखीम पत्करण्याची तयारी असेल तर बरेच जण शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये देखील गुंतवणूक करत असतात. साधारणपणे बँकेच्या विविध मुदत ठेव योजनांना गुंतवणुकीसाठी जास्त करून प्राधान्य दिले जाते. कारण बँकेतील गुंतवणूक सुरक्षित राहतेच परंतु परतावा देखील चांगला मिळतो.

अगदी याच अनुषंगाने जर आपण बँक ऑफ बडोदाचा विचार केला तर नुकतीच बँक ऑफ बडोदाच्या माध्यमातून ग्राहकांकरिता एक विशेष एफडी योजना लॉन्च करण्यात आलेली असून या एफडी योजनेचे नाव आहे ग्रीन टर्म डिपॉझिट स्कीम होय.

काही विशेष योजनांकरिता बँकेच्या माध्यमातून पैसा उभारण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे व या माध्यमातून उभा राहिलेला पैसा हा देशातील काही पर्यावरण पूरक प्रकल्पांमध्ये गुंतवला जाणार आहे.

 बँक ऑफ बडोदाच्या या योजनेत कुणाला करता येईल गुंतवणूक?

बँक ऑफ बडोदाच्या या ग्रीन टर्म डिपॉझिट योजनेमध्ये भारतीय रहिवासी, एनआरआय आणि एचएनआय गुंतवणूकदार गुंतवणूक करू शकणार आहेत. तसेच बँक ऑफ बडोदाचे विद्यमान ग्राहक आणि नवीन ग्राहक देखील देशातील कुठल्याही बँक ऑफ बडोदाच्या शाखेतून ही ग्रीन डिपॉझिट उघडू शकणार आहेत.

 या योजनेत जमा झालेला पैसा बँक कुठे गुंतवणार आहे?

बँक ऑफ बडोदाच्या ग्रीन टर्म डिपॉझिट योजनेमध्ये ठेवीदारांना स्थिर आणि सुरक्षित आर्थिक परतावा मिळण्याचा दुहेरी फायदा तर होईलच. तसेच या योजनेच्या माध्यमातून जमा केलेला पैसा हा ग्रीन प्रोजेक्ट अर्थात हरित प्रकल्प, अक्षय ऊर्जा, शाश्वत पाणी आणि कचरा व्यवस्थापन, ऊर्जा कार्यक्षमता, हवामान बदल अनुकूलन, प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण तसेच हरित इमारती व जैवविविधता या ठिकाणी वापरला जाणार आहे.

 वेगवेगळ्या कालावधीकरिता किती राहील व्याजदर?

बँकेच्या ग्रीन टर्म डिपॉझिट योजनेत कमीत कमी पाच हजार रुपये ते जास्तीत जास्त दोन कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येणार आहे व या गुंतवणुकीवर बँकेच्या माध्यमातून ग्राहकांना 6.40% पासून ते जास्तीत जास्त 7.15 टक्क्यांपर्यंत व्याज देण्यात येणार आहे. जर आपण यामध्ये कालावधीनुसार पाहिले तर साधारणपणे…

 एक वर्ष केलेल्या मुदत ठेवीवर 6.75 टक्के व्याज देण्यात येणार आहे

 दीड वर्ष केलेल्या मुदत ठेवीवर 6.75 टक्के इतके व्याज मिळणार आहे

 777 दिवसाच्या मुदत ठेवीवर 7.15% इतका व्याजदर मिळणार आहे.

 1111 दिवसांच्या मुदत ठेवीवर 6.40% इतका व्याजदर मिळणार आहे.

 1717 दिवसांच्या मुदत ठेवीवर 6.40% इतका व्याजदर मिळणार आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil