आर्थिक

Home Loan EMI: ‘हे’ पर्याय वापरा आणि होमलोनचा हप्ता कमी करा! होईल मोठा फायदा

Published by
Ajay Patil

Home Loan EMI:- बरेचजण वेगवेगळ्या कारणांकरिता बँक किंवा इतर वित्तीय संस्थांकडून कर्ज घेतात. यामध्ये घर बांधण्यासाठी किंवा घर खरेदी करण्यासाठी होमलोन, कार घेण्यासाठी कारलोन आणि इतर वैयक्तिक गरजा भागवण्यासाठी पर्सनल लोन घेतले जाते.

घेतलेल्या या कर्जाची परतफेड करण्यासाठी आपल्याला प्रत्येक महिन्याला ईएमआय भरणे गरजेचे असते व त्याकरता आपल्याला प्रत्येक महिन्याला नियमितपणे घेतलेल्या कर्जाचा हप्ता म्हणजेच ईएमआय भरावा लागतो.

यामध्ये जर आपण होम लोनचा विचार केला तर हे दीर्घकालीन चालणारे कर्ज असते व यामुळे आपल्या आर्थिक बजेटवर बऱ्याचदा ताण येण्याची शक्यता असते. परंतु तरीदेखील आपल्याला गृह कर्जाचा हप्ता नियमितपणे भरणे गरजेचे असते.

परंतु होम लोनचा तुम्ही भरत असलेला हप्ता जर काही पर्याय वापरले तर तो कमी करता येऊ शकतो. म्हणजेच तुम्ही काही पर्यायांची मदत घेऊन तुमचा ईएमआय कमी करू शकता. त्याबद्दलची माहिती या लेखात घेऊ.

 अशा पद्धतीने कर्जाचा ईएमआय करता येईल कमी

बऱ्याचदा होम लोनचे हप्ते फेडता-फेडता नाकी नऊ येतात व आर्थिक अडचणींना तोंड द्यायला लागते. घेतलेल्या कर्जाचे हप्ते फेडायला जर अडचण येत असेल तर काही पर्यायांचा वापर करून चालू असलेले कर्जाचे हप्ते आपण कमी करू शकतो.

यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पहिला मार्ग म्हणजे तुम्ही बँकेकडे कर्जावरील व्याज कमी करा अशी विनंती करू शकतात. जर तुमचा सिबिल स्कोर चांगला असेल तर अशा प्रकारची विनंती बँकेला करणे शक्य आहे.

तुमचा सिबिल स्कोर चांगला असेल तर बँकेच्या मॅनेजरकडून कर्जावरील व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. या व्यतिरिक्त तुम्ही

1- समजा तुम्ही जे काही कर्ज घेतलेले आहे ते जर फिक्स इंटरेस्ट धोरणानुसार घेतले असेल तर ते कर्ज फ्लोटिंग इंटरेस्ट रेटवर बदलता येऊ शकते. जर येणाऱ्या कालावधीत रिझर्व बँकेच्या माध्यमातून रेपो रेट कमी केले तर अशावेळी फ्लोटिंग  इंटरेस्ट रेटनुसार तुमचा कर्जाचा हप्ता कमी होऊ शकतो.

2- तसेच दुसरा पर्याय म्हणजे तुम्ही कर्ज फेडण्याचा कालावधी वाढवून घेऊ शकतात. अशाप्रकारे जर तुम्ही कालावधी वाढवला तर तुम्हाला कर्जाचा हप्ता कमी करून घेता येतो.

3- तसेच तुमचा कर्जाचा हप्ता आणि व्याजदर जर कमी करायचा असेल तर तुमचे जे काही चालू असलेले कर्ज आहे ते तुम्ही हस्तांतर म्हणजेच पोर्ट करू शकतात.

म्हणजेच ते एका बँकेतून दुसऱ्या बँकेमध्ये ट्रान्सफर करू शकतात. त्यावेळी तुम्ही ज्या बँकेमध्ये तुमचं कर्ज ट्रान्सफर कराल ती बँक तुम्हाला व्याजदर कमी करू शकते व यामुळे तुमचा ईएमआय कमी होऊ शकतो.

4- तुम्हाला जर कर्जाचा हप्ता कमी करायचा असेल तर तुम्ही दरवर्षी एक किंवा दोन किंवा त्यापेक्षा जास्तीचे हप्ते भरू शकतात. त्यामुळे तुमच्या कर्जाचा कालावधी कमी होतो व हप्ता देखील कमी होण्यास मदत होते.

Ajay Patil

Published by
Ajay Patil