PF Money Withdrawal:- खाजगी आणि सरकारी क्षेत्रात काम करणारे जे काही भारतीय कर्मचारी आहेत त्यांचे पीएफ खाते असते. आपल्याला माहित आहे की प्रत्येक महिन्याच्या पगाराच्या काही भाग कापला जातो व तो तुमच्या पीएफ खात्यात जमा केला जातो व काही भाग हा कंपनीच्या माध्यमातून देखील तुमच्या पीएफ खात्यात जमा केला जात असतो व या पीएफ खात्यामध्ये जमा झालेल्या रकमेवर सरकारच्या माध्यमातून व्याज देखील दिले जाते.
पीएफ खात्यामध्ये जी काही रक्कम जमा होत असते ही एक प्रकारची तुमची पैशांची बचतच असते व भविष्यातील आर्थिक गरजा भागवण्यासाठी तुमच्यासाठी ही रक्कम खूप महत्त्वाची ठरते. जर तुम्हाला काही कामानिमित्त पैशांची गरज भासली तर तुम्ही यामधून कधीही पैसे काढू शकतात.
परंतु यासाठी काही नियम व अटी असून त्या पाळणे खूप गरजेचे असते. तसेच काही ठराविक कामांसाठी तुम्ही पीएफ खात्यातून पैसे काढू शकता व प्रत्येक कामाकरिता मिळणारी रक्कम देखील वेगवेगळी असते. याबद्दलची माहिती या लेखात बघू.
पीएफ खात्यातून कोणत्या कामासाठी किती काढता येतो पैसा?
1- मेडिकल इमर्जन्सी/ वैद्यकीय उपचार– आरोग्य विषयी समस्या कधीही कोणाच्या आयुष्यामध्ये निर्माण होऊ शकते व अशावेळी अचानकपणे पैशांची गरज भासू शकते. एखाद्या पीएफ खातेधारकाला जर उपचारांकरिता आपत्कालीन परिस्थितीमध्ये पैशांची गरज भासली तर पीएफ खात्यातून पैसे काढता येणे शक्य आहे.
यासाठी पीएफ खातेदाराला फॉर्म 31 आणि त्यासोबत सी सर्टिफिकेट जमा करणे गरजेचे असते व महत्त्वाचे म्हणजे त्यावर डॉक्टर आणि खातेदारांच्या सह्या आवश्यक असतात. पीएफ खातेधारकाला वैद्यकीय उपचारांसाठी एकावेळी एक लाख रुपयांपर्यंत रक्कम काढता येते.
2- घराची खरेदी– व्यक्तीला स्वतःचे घर असावे हे स्वप्न असते व अशावेळी हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जर घर घ्यायचे असेल तर पैशांची गरज भासते. त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने घर घेण्यासाठी देखील पीएफ खात्यातून पैसे काढू शकतात. परंतु यासाठी सगळ्यात महत्वपूर्ण अट म्हणजे तुमचे जे काही पीएफ खाते आहे ते तीन वर्षे जुने असणे गरजेचे आहे.
घर खरेदीसाठी तुम्हाला तुमच्या पीएफ खात्यातून जमा झालेल्या एकूण रकमेच्या 90% रक्कम मिळू शकते व लक्षात घेण्याची बाब म्हणजे ही सुविधा तुम्हाला फक्त एकदाच मिळते.
3- घराचे रिनोवेशन म्हणजेच नूतनीकरण– तुमचा फ्लॅट किंवा घर असेल व त्याचे तुम्हाला नूतनीकरण करायचे असेल तरीदेखील तुम्ही पीएफ खात्यातून पैसे काढू शकतात.
घराच्या नूतनीकरणाकरिता जर तुम्हाला पैसे काढायचे असतील तर तुमचे पीएफ खाते हे पाच वर्षे जुने असणे गरजेचे आहे. घराच्या नूतनीकरणाकरिता तुमच्या महिन्याच्या पगाराच्या बारा पट रक्कम काढू शकतात. घराच्या रेनोवेशनसाठी तुम्ही दोनदा पैसे काढू शकतात.
4- होम लोनचा ईएमआय– घर घेण्यासाठी बऱ्याच लोकांनी होम लोन घेतलेले असते व त्याचा ईएमआय आपल्याला प्रत्येक महिन्याला भरावा लागतो.
काही कारणास्तव जर ईएमआय भरणे कठीण होत असेल तर तुम्ही या कारणासाठी देखील पीएफ खात्यातून पैसे काढू शकतात. याकरिता सगळ्यात महत्त्वाचे अट म्हणजे तुमचे पीएफ खाते तीन वर्षे जुने असणे गरजेचे असून याकरिता तुम्ही तुमच्या जमा रकमेतून 90% रक्कम काढू शकतात.
5- लग्नकार्य– बऱ्याचदा घरामध्ये लग्नासारखा कार्यक्रम असतो व त्यावेळी बऱ्याच प्रमाणात पैसे लागतात. अशावेळी जर तुमच्याकडे पुरेसा पैसा नसेल तर तुम्हाला तुमचे पीएफ खात्यातून पैसा काढता येतो. याकरिता कर्मचाऱ्यांची त्याच्या पीएफ खात्यामध्ये जे काही योगदान असेल म्हणजे जी जमा रक्कम असेल त्याच्या 50% पर्यंतचे रक्कम व्याजासह काढू शकतो
व याकरता सगळ्यात महत्त्वाची अट म्हणजे कमीत कमी पीएफ खात्यात तुमचे सात वर्षापासून योगदान असावे. या सुविधेतर्गत स्वतःचे लग्न तसेच भाऊ आणि बहिणीच्या लग्नासाठी देखील पैसे काढता येऊ शकतात.