अहमदनगर Live24 टीम, 05 फेब्रुवारी 2021:-आपण स्टेट बँक ऑफ इंडियाचे (एसबीआय) खातेदार असल्यास बँकेच्या एटीएममधून कॅश काढण्यासाठी डेबिट कार्ड असणे आवश्यक नाही.
एसबीआय खातेधारक बिना डेबिट कार्ड बँक एटीएममधून कॅश काढू शकतात आणि ते सोयीस्कर तसेच सुरक्षित देखील आहेत. यासाठी खातेधारकाकडे स्मार्टफोनमध्ये एसबीआय योनो अॅप असणे आवश्यक आहे.
योनो अॅपद्वारे आपण केवळ एसबीआय एटीएममधून पैसे काढू शकता. याद्वारे जास्तीत जास्त 20 हजार रुपयांपर्यंतची रक्कम काढता येईल. याशिवाय YONO LITE App च्या द्वारे बिना ओटीपी शिवाय तुम्ही क्यूआर कोड स्कॅन करून कॅश विदड्रॉल करू शकता.
क्यूआर कोडद्वारे ओटीपी कॅश विदड्रॉल करा
स्टेपवाईज YONO App वरून कॅश विदड्रॉलची प्रोसेस
एटीएमवर ट्रांजेक्शन फेल झाल्यास घाबरू नका :- काही तांत्रिक अडचणीमुळे खातेधारक एटीएममध्ये रोकड काढण्यास अक्षम झाल्यास आणि खात्यातून ही रक्कम कपात केली गेली असल्यास घाबरून जाण्याची गरज नाही. आपल्या बँकेस त्वरित कळवा. वजा केलेली रक्कम सात वर्किंग डे च्या आत आपल्या खात्यात परत जमा होईल.