केंद्र सरकारच्या माध्यमातून समाजातील वेगवेगळ्या अनेक घटकांसाठी महत्वाच्या योजना राबवल्या जात असून या योजनेच्या माध्यमातून अशा समाज घटकांचे दृष्टीकोनातून जीवनमान उंचवावे हा त्यामागचा प्रमुख उद्देश आहे. अगदी याप्रमाणेच आता केंद्र सरकारच्या माध्यमातून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जुलैमध्ये जेव्हा आर्थिक वर्ष 2024-25 चा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला होता तेव्हा त्यामध्ये एनपीएस वात्सल्य या नवीन पेन्शन योजनेची घोषणा केली होती.
ही पेन्शन योजना तसे पाहिले तर मुलांसाठी आहे व मुलांचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्यासाठी मुलांच्या माध्यमातून त्यांचे पालक या योजनेत गुंतवणूक करू शकता. महत्वाचे म्हणजे घोषणा झाल्यानंतर येणाऱ्या 18 सप्टेंबर रोजी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन या योजनेची सुरुवात करणार असून याकरिता नोंदणी करण्यासाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्म देखील आता सुरू केला जाणार आहे.
कसे आहे एनपीएस वात्सल्य योजनेचे स्वरूप?
लहान मुले जेव्हा मोठी होतील तेव्हा आर्थिक दृष्टिकोनातून त्यांना सुरक्षितता मिळावी याकरिता ही योजना तयार करण्यात आलेली आहे. मुलांच्या वतीने त्यांचे पालक या योजनेत गुंतवणूक करू शकतात. त्यानंतर संबंधित मूल जेव्हा अठरा वर्षाचे होईल तेव्हा एनपीएस वात्स्यल्य योजनेचे एनपीएस योजनेत रुपांतर केले जाईल व नियमितपणे एनपीएस योजना सेवानिवृत्ती निधी उभारण्यास मदत करणारी योजना असल्याने या योजनेतून मुलांना लाभ मिळेल.
मुलांच्या नावाने नॅशनल पेन्शन सिस्टम अर्थात एनपीएस वात्सल्य योजनेत गुंतवणूक करणे हा त्यांच्या भविष्यासाठी महत्त्वाचे असून भविष्यकालीन आर्थिक सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून देखील एक निश्चित खात्री मिळवण्याचा उत्तम पर्याय आहे.
एनपीएस वात्सल्य योजना दीर्घकालीन गुंतवणूक योजना असून जी पेन्शन फंड नियमक आणि विकास प्राधिकरण द्वारे व्यवस्थापित केली जाते. या योजनेमध्ये मुलांच्या नावाने खाते हे कोणताही भारतीय नागरिक म्हणजेच तो निवासी असो वा अनिवासी यांना उघडता येणार आहे. मुलांचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर ही योजना नियमित एनपीएस मध्ये बदलली जाईल.
या योजनेत तुमच्या आवडीनुसार करता येईल गुंतवणूक
तुमच्या मुलाच्या एनपीएस वात्सल्य योजना खात्यामध्ये कमीत कमी शंभर रुपये वार्षिक जमा करू शकतात. यामध्ये कमाल गुंतवणुकीचे कुठल्याही प्रकारची मर्यादा नाही. नाहीतर तुम्ही तुमच्या आवडीनुसार डेट किंवा मनी तसेच इक्विटी मार्केटमध्ये गुंतवणूक करू शकता.
असे केल्यामुळे तुम्हाला जमा झालेल्या रकमेवर कर लाभ देखील मिळू शकतो. तेव्हा तुमच्या मुलाचे वय 18 वर्षे पूर्ण होईल तेव्हा त्याच्या एनपीएस वात्सल्य योजनेच्या खात्यातून ती रक्कम काढता देखील येईल. सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुमच्या मुलाला त्याचे साठ वर्षे पूर्ण झाल्यावर पेन्शन देखील मिळू शकते.