तुम्हाला कुठल्याही बँकेच्या माध्यमातून पर्सनल लोन, होमलोन किंवा कार लोन घ्यायचे असेल तर सगळ्यात आधी तुमची क्रेडिट हिस्टरी म्हणजे तुमचा सिबिल स्कोर चेक केला जातो. जर तुमचा सिबिल स्कोर उत्तम असेल तर तुम्हाला कर्ज मिळण्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही.
अगदी याच पद्धतीने क्रेडिट कार्ड घेण्यासाठी देखील तुमचा सिबिल स्कोर आधी तपासला जातो. परंतु यामध्ये जर तुमचा सिबिल स्कोर घसरलेला किंवा चांगला नसेल तर तुम्हाला क्रेडिट कार्ड मिळू शकत नाही.
परंतु यामध्ये तुम्हाला क्रेडिट कार्ड घ्यायचे आहे परंतु तुमचा क्रेडिट स्कोर चांगला नाही तरी देखील तुम्हाला आता क्रेडिट कार्ड घेणे शक्य आहे. अशा व्यक्तींकरिता आता मुदत ठेवीच्या बदल्यामध्ये क्रेडिट कार्ड घेता येऊ शकते.
यालाच आपण सिक्युर्ड क्रेडिट कार्ड अर्थात सुरक्षित क्रेडिट कार्ड असे देखील म्हणतो. या क्रेडिट कार्डच्या मदतीने तुम्ही तुमचा घसरलेला सिबिल स्कोर सुधारू शकतात. तसे पाहायला गेले तर या पद्धतीचे म्हणजेच सुरक्षित क्रेडिट कार्डसाठी किती रुपयांची एफडी करावी लागेल
यासाठीची किमान रक्कम वेगवेगळ्या बँकांप्रमाणे ती बदलत असते. परंतु या लेखामध्ये आपण अशा क्रेडिट कार्डबद्दल माहिती घेणार आहोत जी तुम्ही दोन हजार रुपयांची एफडी केल्यानंतर घेऊ शकतात.
2 हजार रुपयांची एफडी करा आणि स्टेप अप क्रेडिट कार्ड घ्या
स्टेप अप क्रेडिट कार्ड हे एसबीएम बँक( इंडिया) लिमिटेड द्वारे जारी केलेले एक सुरक्षित क्रेडिट कार्ड आहे. ज्यामध्ये पैसा बाजार सह ब्रॅण्डेड भागीदार असून हे कार्ड एसबीएम बँकेत केलेल्या एफडीवर दिले जाते. एवढेच नाही तर ग्राहकाला केलेल्या एफडीवर वार्षिक 6.50% दराने व्याज देखील मिळते.
स्टेप अप क्रेडिट कार्डची वैशिष्ट्ये काय आहेत?
हे एक सुरक्षित प्रकाराचे क्रेडिट कार्ड असून ते एसबीएम बँक( इंडिया) लिमिटेड कडून जारी करण्यात आलेले आहे. या कार्डसाठी नूतनीकरण शुल्क लागत नाही तसेच व्याज मुक्त कालावधी हा वीस ते पन्नास दिवसांचा असतो. या क्रेडिट कार्डवर तुम्ही ठेवलेल्या एफडीच्या 90% पर्यंत लिमिट मिळतो. तसेच प्रत्येक 100 रुपये खर्चासाठी एक रिवार्ड पॉईंट मिळतो. तसेच तुम्ही केलेल्या एफडीवर 6.50% व्याज देखील मिळते.