आर्थिक

Youtube Earnings: युट्युबवर व्हिडिओ अपलोड करा आणि लाखोंची कमाई करा! तुम्हाला माहिती आहे का किती व्हूजजवर किती मिळतो पैसा?

Published by
Ajay Patil

Youtube Earnings:- सध्या इंटरनेटच्या या युगामध्ये सोशल मीडियाचा वापर फार मोठ्या प्रमाणावर केला जातो. यामध्ये प्रामुख्याने इंस्टाग्राम, फेसबुक आणि युट्युबचा वापर फार मोठ्या प्रमाणावर होतो. या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला बरीच माहिती तर मिळतेच

परंतु हे कमाईचे साधन देखील आहे. त्या माध्यमातून अनेक कंटेंट आणि व्हिडिओ क्रिएटर्स खूप चांगल्या पद्धतीने पैसा कमावताना आपल्याला दिसून येतात. यामध्ये जर यूट्यूबचा विचार केला तर सर्वात जास्त प्रमाणामध्ये यूट्यूबच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पैसा बरेच जण मिळवतात.

आपल्याला माहित आहेच की, अनेक व्यक्ती वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओ बनवतात व ते युट्युबवर अपलोड करून चांगल्या पद्धतीने पैसे मिळवतात. परंतु यामध्ये विचार केला तर यामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणावर कष्ट करणे गरजेचे असते.

नुसते व्हिडिओ अपलोड करून यामध्ये पैसे मिळत नाही तर यासाठी युट्युबचा एक क्रायटेरिया असतो व तो पूर्ण करणे गरजेचे असते. यामध्ये तुम्ही जो व्हिडिओ अपलोड करतात याकरिता युजर्स आणि व्हूज खूप महत्त्वाचे असतात. त्यामुळे या लेखात आपण youtube च्या माध्यमातून कसे पैसे मिळू शकतात?याबद्दलची माहिती घेऊ.

 यूट्यूबच्या माध्यमातून पैसे मिळतील परंतु या गोष्टींकडे द्यावे लागेल लक्ष

 यामध्ये तुमचे जे काही यूट्यूब चैनल असते सबस्क्राईबर म्हणजेच फॉलोवर्स किती आहेत व तुमच्या व्हिडिओला व्ह्यू किती येतात यावर आधारित तुम्हाला पैसे मिळत असतात. याबाबत यूट्यूबच्या माध्यमातून काही नियम असून त्या नियमांना धरूनच तुम्हाला पैसे मिळत असतात.

तुम्हाला जितके पैसे मिळण्यासाठी फॉलोवर्स म्हणजे सबस्क्राईब आणि व्ह्यू महत्वाचे आहेत तितक्याच जाहिराती देखील महत्त्वाचे आहेत. यामध्ये युट्युबवर कमाई जाहिरातींच्या माध्यमातून होते. आपल्याला माहित आहे की आपण जेव्हा युट्युबवर एखादा व्हिडिओ पाहतो तेव्हा तो व्हिडिओ सुरू होतो त्या अगोदर किंवा नंतर जाहिरात दिसते

व या जाहिरातींच्या माध्यमातूनच youtube ला पैसा मिळत असतो. तुम्ही व्हिडिओ अपलोड केला आणि तुमचे अकाउंट जर गुगलच्या ॲडसेन्सची लिंक असेल तर युट्युब त्यावर जाहिराती टाकतो

व जेव्हा कोणी व्हिडिओ प्ले करतो तेव्हा ती जाहिरात दिसायला लागते. अशा जाहिरातींमधून यूट्यूबला पैसा मिळतो त्यामधूनच युट्युब तुम्हाला पैसे देत असते.

 जाहिरातीच्या माध्यमातून पैसे मिळण्याचे गणित कसे असते?

 समजा युट्युब वर तुम्ही व्हिडिओ टाकला आणि तो दहा हजार लोकांनी पाहिला. परंतु हा व्हिडिओ पाहताना जर जाहिरात कोणीही पाहिली नाही म्हणजेच प्रत्येक वेळी व्हिडिओ प्ले करताना स्कीप बटनावर क्लिक करून

जाहिरात स्कीप केली तरी युट्युब तुम्हाला पैसे देत नाही. जर 1000 लोकांनी तुमचा व्हिडिओ पाहिला आणि सर्वांनी जर जाहिराती पाहिल्या तर तुम्हाला त्यासाठी मात्र पैसे मिळतात.

तुमच्या व्हिडिओ वर टाकण्यात आलेली जाहिरात जितकी महाग असेल तितकी youtube चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला कमाई जास्त होते.

 किती व्ह्यूजसाठी किती मिळतात पैसे?

 जर आपण व्ह्यू नुसार पाहिले तर 1000 व्ह्यू साठी 42 रुपये, 2000 साठी 85 रुपये, दहा हजारांसाठी 390 रुपये, एक लाख व्ह्यू साठी चार हजार 382 रुपये, दहा लाख साठी 42 हजार 350 रुपये,

एक कोटी व्ह्यूसाठी चार लाख 21 हजार रुपये, दहा कोटी व्ह्यूसाठी 42 लाख 33 हजार रुपये  आणि शंभर कोटी व्ह्यूसाठी चार कोटी 23 लाख रुपये तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून मिळतात.

 अशा पद्धतीने तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून तगडी कमी करू शकतात.

Ajay Patil