Monsoon Update : यावर्षी लवकर येण्याचा अंदाज असलेला आणि त्यानुसार वाटचाल सुरू झालेल्या मान्सूनच्या मार्गात आता अडथळा निर्माण झाला आहे.

त्यामुळे त्याला भारतीत किनारपट्टीवर म्हणजे केरळमध्ये दाखल होण्यास उशीर होण्याची शक्यता आता वर्तविण्यात आली आहे.अंदाजाप्रमाणे मान्सूनचा प्रवास सुरू झाला. तो अरबी समुद्रापर्यंत पोहचला.

मात्र श्रीलंकेच्या वेशीवर त्याचा खोळंबा झाला आहे. गेल्या तीन दिवसापासून मान्सून श्रीलंकेच्या वेशीवरच आहे. केरळमध्ये २७ मे रोजी मान्सून येण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. मात्र, हा अंदाज हुकण्याची शक्यता आहे.

त्यामुळे पुढच्या टप्याचा प्रवास खोळंबला आहे. दरम्यान, महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्यासाठी जूनचा पहिला आठवडा उजाडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

२१ मे रोजी मान्सून अरबी समुद्रात श्रीलंकेच्या किनारपट्टीपासून काही अंतरावर दाखल झाला होता. नियोजित वेळेपेक्षा सहा दिवस आधीच मान्सूनचे वारे सक्रीय झाले होते. मान्सून सध्या श्रीलंकेच्या किनारपट्टीवर अडकला असल्याने भारतात मान्सून आगमनाला विलंब लागण्याची शक्यता आहे.