अहमदनगर Live24 टीम, 03 जानेवारी 2022 :-  निर्बंध शिथिल झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या मालाने बाजार समित्यांचा परिसर गजबजू लागला आहे. शेतातील पिकविलेला माल घेऊन शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल होऊ लागले आहे.(Rahata Bazar Samiti)

नुकतेच कांद्याची मोठी आवाक बाजारात होऊ लागली आहे. यातच राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत 2818 गोणी कांद्याची आवक झाली. कांद्याला जास्तीत जास्त 2700 रुपये भाव मिळाला आहे.

जाणून घ्या कांद्याला मिळालेला दर (प्रतिक्विंटल)

कांदा नंबर 1 ला 2300 ते 2700 असा दर मिळाला

कांदा नंबर 2 ला 1450 ते 2250 रुपये असा दर मिळाला

कांदा नंबर 3 ला 500 ते 1400 रुपये इतका दर मिळाला

गोल्टी कांदा 1800 ते 2000 रुपये असा दर मिळाला

जोड कांदा 100 ते 400 रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला