Maharashtra News:राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी लोकसंख्या नियंत्रणावर भाष्य केले होते. ‘सर्वांना सारखेच लागू असणारे लोकसंख्या धोरण असावे,’

अशी मागणी त्यांनी केली होती. त्यांचा रोख अर्थातच मुस्लिमांकडे होता. त्यांच्या या वक्तव्याला AIMIM खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी उत्तर दिले आहे. ओवैसी यांनी म्हटले आहे की, ‘मुस्लिम लोक कंडोमचा सर्वाधिक वापर करतात, त्यांची लोकसंख्या वाढत नाही.

तर उलट कमी होत आहे. मात्र भागवत यावर बोलणार नाहीत. मुस्लिमांची लोकसंख्या वाढत नाही. लोकसंख्या वाढत आहे या भयंकर तणावाखाली तुम्ही लोक पडू नका.

मुस्लिमांची लोकसंख्या कमी होत असून दोन मुलांमधील अंतरही मुस्लिमांमध्ये कमी होत आहे. तुम्ही डेटा समोर ठेवा आणि बोला, लोकसंख्या कुठे वाढतेय?’ असा सवाल ओवैसी यांनी भागवत यांना केला.