अहमदनगर Live24 टीम, 08 जानेवारी 2022 :-  राजकीय नेते व त्यांचे समर्थक यांचे अतूट नाते आहे. अनेकदा आपल्या समर्थक असलेल्या एखाद्या कार्यकर्त्यासाठी राजकीय नेते आपले महत्त्वाचे काम सोडून ‘त्या’ कार्यकर्त्यांच्या कमाला प्राधान्य देतात तर समर्थक ‘तुमच्यासाठी काहीपण’ या भूमिकेत असतात.

असाच अनुभव कर्जत जामखेड तालुक्यात आला.कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार हे कोरोना बाधित आहेत.

ते लवकर बरे व्हावेत यासाठी येथील धांडे या उद्योजकाने तुळजापूरच्या देवीला ‘आई जगदंबे दादांंना लवकर बरे कर’ असे साकडे घातले आहे.

आमदार रोहित पवार यांना कोरोना झाला असून, त्याच्या तब्येतीसाठी अनेक जण पूजाअर्चा करत आहेत, आरती करत आहेत तर कुणी नवस बोलत आहेत.

यात कर्जत तालुक्यातील धांडेवाडीचे युवा उद्योजकाने आपल्या गावातील विठ्ठल रुख्मिनी मंदिरात,कर्जतचे ग्रामदैवत संत श्री गोदड महाराज मंदिरात आरती करून पूजा केली व महाराष्ट्राचे कुलदैवत तुळजाभवानी मातेच्या मंदिरात जाऊन पूजा केली.