अहमदनगर Live24 टीम, 19 ऑक्टोबर 2021 :- लोणी पोलिस स्टेशनमध्ये गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून मोटरसायकली पडलेल्या आहेत.

वाहन मालकांचा शोध घेतला असता वाहन मालक आढळून आलेले नाही. वाहने पूर्णपणे सडलेली असून चेसी नंबर इंजिन नंबर अर्धवट आहेत.ही वाहने पुन्हा ना दुरुस्ती होणारे नाही.

राहाता तहसीलदार यांच्या आदेशानुसार या मोटारसायकलींची लिलावाद्वारे विक्री होणार आहे. ज्यांना लिलावात भाग घ्यावयाचा आहे त्यांनी २९ ऑक्टोबार पर्यंत अनामत रक्कम लोणी स्टेशनला जमा करून नोंदणी करावी.

येताना सोबत स्वतःचे आधार कार्ड स्वतःची नावे जीएसटी नंबर दुकान असणे बंधनकारक आहे, अशी माहिती लोणी पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक समाधान पाटील यांनी दिली.