files photo

अहमदनगर Live24 टीम, 05 ऑक्टोबर 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांपासून वाढू लागला आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू केल्या आहेत.

तसेच कठोर नियमांची देखील अंमलबजावणी होऊ लागली आहे, दरम्यान यातच लॉकडाऊन वरून खासदार सुजय विखे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

भाजप आमदार सुजय विखेंनी नगर जिल्ह्यात लावण्यात आलेला लाॅकडाऊन हा अन्यायकारक असल्याचं म्हणत या विरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. तसेच नाशिक आणि पुणे या जिल्ह्यांना वाचवण्यासाठी अजित पवारांनी हा निर्णय लागू करायला लावला असल्याचाही गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

नुकतेच नगर जिल्ह्यातील तब्बल 61 गावांमध्ये लाॅकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. हा लाॅकडाऊन 10 दिवसांसाठी असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.

याच मुद्द्यावरून आता नगर दक्षिणचे खासदार सुजय विखे पाटील हे चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यांनी स्थानिक आमदारांसह उपमुख्यमंत्री अजित पवारांवरही टीकास्त्र डागलं आहे.

जिल्ह्यात लाॅकडाऊन करण्याचा निर्णय कुणी घ्यायला लावला याबद्दल स्थानिक सत्ताधारी आमदारांनी उत्तर द्यावं, असं म्हणत फक्त भाजप आमदारांच्या मतदारसंघातच लाॅकडाऊन लावलं जातं असा गंभीर आरोप सुजय विखे यांनी केला आहे.