अहमदनगर Live24 टीम, 20 ऑक्टोबर 2021 :- जनता प्रश्न सोडवणार्‍याच्या पाठीमागेच भक्कमपणे उभी राहतेच. माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी ३० वर्ष जनतेचे प्रश्न सोडविले आहेत. त्यामुळे आजही जनता त्यांच्याबरोबर आहे.

विखे कुटुंबावरही जनता मागील५० वर्षापासून भरभरून प्रेम करत आहे. कर्डिले हे आमदार होणारच आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये अनेक राजकीय नेत्यांच्या चुकीच्या कामांचा पर्दाफाश करणार आहे.

केंद्र सरकारच्या योजना या युवकांच्या माध्यमातून शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्याचे काम आपण सर्वजण मिळून करू, असे प्रतिपादन खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केली आहे.

यावेळी कर्डिले म्हणाले, जनतेत राहून प्रश्न सोडविल्यास जनता बरोबर राहते, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमध्ये जो उमेदवार जनतेत राहून काम करत असेल त्याचा विचार केला जाईल.

विखे कुटुंबीयांशी आमचे जवळचे संबंध आहे कै.बाळासाहेब विखे पाटील यांनी मला अपक्ष आमदार करण्यास महत्त्वाची भूमिका पार पाडली होती.

मी त्यांचा आवडता कार्यकर्ता म्हणून माझी जिल्हाभरात ओळख होती आता ही राधाकृष्ण विखे पाटील व खासदार सुजय विखे पाटील यांच्याशी आजही ते ऋणानुबंध आहेत तसेच भविष्यातही असेच ऋणानुबंध राहतील असे ते म्हणाले.