अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2022 :- MPSC द्वारे आयोजित राज्यसेवा मुलाखत कार्यक्रम आजच संपला आहे. आणि एका तासात आयोगाने निकाल घोषित केला आहे.MPSC च्या इतिहासात प्रथमच एवढया गतिमानतेने निकाल घोषित होत आहे.

MPSC कडून आज राज्यसेवा निकालबाबत घोषणा करण्यात आली आहे, राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२० करिता १८ ते २९ एप्रिल या कालावधीत घेण्यात आलेल्या मुलाखतीच्या आधारे ही यादी घोषित करण्यात आली आहे.

राज्यात प्रमोद बाळासाहेब चौगुले ६१२.५० गुण संपादन करीत पहिल्या क्रमांकावर असून नीतेश नेताजी कदम ५९१.२५ गुण मिळवत दुसऱ्या क्रमांकावर आहे. राज्यात तिसरी आणि महिलांमध्ये पहिला येण्याचा मान रूपाली गणपत माने हीने ५८०.२५ गुणांवर मिळविला आहे.

आयोगाने ५९७ उमेदवारांची गुणवत्ता यादी घोषित केली आहे. आजवरच्या आयोगाच्या इतिहासातील हा पहिला जलद गतीने लागलेला निर्णय आहे. ज्यामध्ये मुलाखती पार पडल्या त्याच दिवशी अवघ्या चार तासात अंतिम निकाल जाहीर केला आहे.

आयोगाने आपल्या कार्यपद्धतीत केलेल्या बदलाचा हा परिणाम आहे. मागील महिन्यातही ज्या परीक्षांच्या मुलाखती झाल्या. त्याच दिवशी त्यांचे निकाल घोषित करण्यात आले आहे.

वाचा सविस्तर पुढील लिंकवर
https://mpsc.gov.in/downloadFile/english/4898

याबाबत सविस्तर असे कि आयोगाकडून डिसेंबर २०१९ मध्ये १५ संवर्गातील २०० पदांसाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. एप्रिल २०२०मध्ये परीक्षा घेण्याचे आयोगाचे नियोजन होते. मात्र करोनाच्या प्रादुर्भावामुळे परीक्षा चार वेळा पुढे ढकलावी लागली.

अखेर मार्च २०२१मध्ये घेण्यात आलेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षा झाली. पूर्व परीक्षेसाठी २ लाख ६२ हजार ८९१ उमेदवारांनी नोंदणी केली, तर १ लाख ७१ हजार ११६ उमेदवारांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. पूर्व परीक्षेचा निकाल सप्टेंबर २०२१मध्ये जाहीर करण्यात आला.

३ हजार २१४ उमेदवारांची मुख्य परीक्षेसाठी निवड करण्यात आली. त्यापैकी २ हजार ८६३ उमेदवारांनी डिसेंबर २०२१मध्ये मुख्य परीक्षा दिली.

त्यातून मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या ६१५ उमेदवारांपैकी ५९७ उमेदवारांनी मुलाखत दिली. त्यानंतर १८ ते २९ एप्रिल दरम्यान मुलाखती घेऊन अंतिम निकालाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली.