file photo

अहमदनगर Live24 टीम, 06 नोव्हेंबर 2021 :-  भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी आता कुटुंबासह दुसऱ्या देशात स्थायिक होण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी यासाठी ब्रिटनची निवड केल्याचा दावा एका अहवालात करण्यात आला आहे.

म्हणजेच अंबानींचे दुसरे घर आता लंडनमध्ये असेल. त्यांनी स्टोक पार्क, बकिंगहॅमशायर, लंडन येथे ३०० एकरची मालमत्ता घेतली. अंबानींच्या नवीन महालात ४९ बेडरुम आहेत.

अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा आणि लक्झरी वस्तूंचा समावेश असेल. या दिवाळीसाठी हे कुटुंब त्यांच्या नवीन घरी गेले आहे. अंबानी कुटुंब सहसा अँटिलियामध्येच दिवाळी साजरी करत असतात.

दिवाळी साजरी केल्यानंतर, अंबानी कुटुंब भारतात परतेल आणि पुढील वर्षी एप्रिलमध्ये त्यांच्या लंडनच्या घरी परत जाईल, असे अहवालात म्हटले आहे. अहवालानुसार, मुकेश अंबानी यांचे ब्रिटनमधील आलिशान घर पूर्ण झाले आहे.

त्यांनी स्टोन पार्कमध्ये 592 कोटी रुपयांमध्ये एक आलिशान घर तयार केले असून त्यात 49 हून अधिक खोल्या, स्विमिंग पूल, मिनी हॉस्पिटल, क्लब, ऑडिटोरियम, पार्क, ओपन एरिया आहे.

तर घरासाठी वेगळा रस्ता तयार करण्यात आला आहे. हे आलिशान घर 300 एकरपेक्षा जास्त जागेत तयार करण्यात आले आहे. घरात विशेष मंदिराची स्थापना केली आहे.

राजस्थानमधून संगमरवरी बनवलेल्या श्रीकृष्ण, हनुमान आणि गणेशाच्या मूर्ती तेथे नेऊन स्थापित केल्या आहेत. बातम्यांनुसार, मंदिराची रचना अगदी तशीच आहे जी त्यांनी मुंबईतील घर आणि ऑफिसमध्ये ठेवली आहे.