अहमदनगर Live24 टीम, 03 ऑक्टोबर 2021 :- बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. NCB ने आर्यनला क्रूझमध्ये त्याच्या उपस्थितीबद्दल बराच वेळ विचारपूस केली, त्यानंतर त्याला अटक करण्यात आलीये.

आर्यन व्यतिरिक्त त्याचे मित्र अरबाज मर्चंट आणि मुनमुन धोमेचा यांनाही अटक करण्यात आली आहे. आर्यन खानसह तिघांना किला कोर्टात हजर केले जाणार आहे.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) शनिवारी रात्री उशिरा मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या क्रूझ जहाजावर छापा टाकला, जिथे मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. यापैकी 8 जणांना एनसीबीने ताब्यात घेतले आणि चौकशी सुरू केली, त्यापैकी तीन जणांना आता अटक करण्यात आली आहे.

मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या या क्रूझवर शनिवारी रात्री उशिरा एनसीबीने छापेमारी केली. यावेळी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. यावेळी एकूण आठ जणांना एनसीबीने ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांची मुंबईतील एनसीबी कार्यालयात चौकशी करण्यात आली.

या चौकशीनंतर अनेकांनी ते सर्वजण पार्टीचा भाग असल्याची कबुली दिली आहे. तर काही जणांकडे ड्रग्स सापडल्याचेही बोललं जात आहे. यामुळे एनसीबीने आता आर्यन खानसह दोघांना अटक केली आहे. आर्यनला अटक केल्यानंतर त्याला वैद्यकीय चाचणीसाठी नेण्यात आलं आहे.

अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) मुंबईत मोठी कारवाई केली आहे. मुंबईच्या समुद्रात क्रूझवर सुरु असलेल्या एका रेव्ह पार्टीवर धाड टाकत एनसीबीने आठ जणांना ताब्यात घेतलं आहे.

यावेळी मोठ्या प्रमाणात ड्रग्जदेखील जप्त करण्यात आलं आहे. दरम्यान यावेळी क्रूझवर बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानदेखील उपस्थित होता.

एनसीबीने अटक केलेल्या तीन जणांमध्ये शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांचा समावेश आहे. तर नुपूर सारिका, इस्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत छोकर आणि गोमित चोप्रा यांचीही रविवारी दिवसभर चौकशी करण्यात आली. अरबाज मर्चंट आर्यनचा मित्र आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार कॉर्डेलिया या २ हजार प्रवासी क्षमतेच्या आलीशान क्रूझवर ड्रग्ज पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. यात उच्चभ्रू वर्गीयांचा प्रामुख्याने समावेश होता. याप्रकरणी आर्यन खान याचीही चौकशी केली गेली. ड्रग्ज पार्टीशी आर्यन खान याचा काय संबंध होता याबाबत त्याची चौकशी करण्यात आली.