राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना मुंबईत ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढचे तीन दिवस त्यांच्यावर उपचार करण्यात येणार आहेत. २ नोव्हेंबर २०२२ रोजी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळू शकतो.

त्यानंतर ते शिर्डी येथे होणाऱ्या पक्षाच्या दोन दिवसीय शिबिरात उपस्थित राहणार आहेत. त्यासाठी ३ नोव्हेंबरलाच शिर्डीत येणार आहेत, असे पक्ष कार्यालयातून सांगण्यात आले.

रुग्णालयात दाखल करण्यात आले असले तरी काळजीचे कारण नाही, त्यामुळे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी तेथे गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.