कोपरगाव : बाजार समितीत कांद्याने अचानक उचल खाल्ली असून, क्विंटलला तब्बल मागील सात महिन्याच्या कालावधीनंतर अडीच हजाराहून अधिक म्हणजे २५६० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत आहे.

आवकेत झालेली मोठी घट व परराज्यात कांद्याचा हंगाम संपल्याने बाजारभावाने ही उसळी घेतली आहे.कांद्याच्या दरात झळाळी आली असून, या आठवड्यात कांद्याने अडीच हजार रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत तब्बल शंभर रुपयांची वाढ झाली आहे. 

कोपरगाव बाजार समितीत सध्या ३ हजार ६०० क्विंटल इतकी आवक होत असून, कांदा नंबर १ – २३०० ते २५६०, नंबर २ – २००० ते २२५०, गोल्टी कांदा २००० ते २२००, खाद १४०० ते १६०० रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळत आहे. कोपरगाव बाजार समितीत किमान १६०० रुपये, कमाल २५६० रुपये, तर सरासरी २००० रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळत आहे. कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने शेतकरीवर्ग समाधानी असल्याची माहिती सभापती संभाजी रक्ताटे, उपसभापती राजेंद्र निकोले यांनी दिली आहे.

बाजार समितीत मंगळवार ते शनिवार असे पाच दिवस डाळींब, कांदा व भुसार मालाचा लिलाव होत असल्याने शेतकऱ्याांनी व्यवस्थित प्रतवारी करून कांदा आणावा, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आली आहे.. कोपरगाव : बाजार समितीत कांद्याने अचानक उचल खाल्ली असून, क्विंटलला तब्बल मागील सात महिन्याच्या कालावधीनंतर अडीच हजाराहून अधिक म्हणजे २५६० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत आहे. आवकेत झालेली मोठी घट व परराज्यात कांद्याचा हंगाम संपल्याने बाजारभावाने ही उसळी घेतली आहे. 

कांद्याच्या दरात झळाळी आली असून, या आठवड्यात कांद्याने अडीच हजार रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत तब्बल शंभर रुपयांची वाढ झाली आहे. कोपरगाव बाजार समितीत सध्या ३ हजार ६०० क्विंटल इतकी आवक होत असून, कांदा नंबर १ – २३०० ते २५६०, नंबर २ – २००० ते २२५०, गोल्टी कांदा २००० ते २२००, खाद १४०० ते १६०० रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळत आहे. कोपरगाव बाजार समितीत किमान १६०० रुपये, कमाल २५६० रुपये, तर सरासरी २००० रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळत आहे. 

कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने शेतकरीवर्ग समाधानी असल्याची माहिती सभापती संभाजी रक्ताटे, उपसभापती राजेंद्र निकोले यांनी दिली आहे. बाजार समितीत मंगळवार ते शनिवार असे पाच दिवस डाळींब, कांदा व भुसार मालाचा लिलाव होत असल्याने शेतकऱ्याांनी व्यवस्थित प्रतवारी करून कांदा आणावा, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आली आहे.