Maharashtra news : शिवसेनेतील बंडखोरीमुळे राज्यात सत्ता नाट्य रंगात आले आहे. अशावेळी सर्वांच्या नजरा पुन्हा एकदा राजभवनाकडे लागल्या आहेत. त्यावरून सोशल मीडियात मीम्सही सुरू झाले आहेत. अशात राजभवानावरून चिंता वाढविणारी बातमी समोर आली आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यपाल कोश्यारी यांना ताप येत होता. खबरदारी म्हणून त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली.

त्या चाचणीचे अहवाल आज आले. त्यातून त्यांना कोरोना झाल्याचे निदान झाले आहे. त्यामुळे आज सकाळीच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शिवसेनेचे बंडोखोर नेते एकनाथ शिंदे त्यांच्या समर्थकांसह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन

त्यांच्याकडे भाजपला समर्थन देत असल्याचं पत्र देणार असल्याची चर्चा होती. मात्र, त्यापूर्वीच राज्यपाल कोश्यारींना रुग्णालयात दाखल केल्यामुळे आता ही प्रक्रिया अजून दोन ते तीन दिवस पुढे जाण्याची शक्यता आहे.