file photo

अहमदनगर Live24 टीम, 02 जानेवारी 2022 :- आशियातील श्रीमंतांच्या यादीत असणारे मुकेश अंबानी व निता अंबानी यांचे सुनेसोबतचे नाते जरा वेगळेच आहे. देशातील सर्वात श्रीमंत अंबानी कुटुंब हे त्यांच्या सुनांचे देखील तेवढेच लाड करतात.

मुकेश अंबानी यांच्या आयुष्यात त्यांनी अनेक चढ-उतार पार केले आहेत. त्यांच्या मागे निता अंबानी देखील खंबीरपणे उभ्या असतात. तसेच अंबानी यांनी त्यांच्या तिन्ही मुलांना खूप चांगले संस्कार दिले आहेत.

अंबानी यांची मोठी सून श्लोका मेहता हि हिरे व्यापारी रसेल मेहता यांची सर्वात लहान मुलगी आहे. लग्नाआधी देखील आकाश आणि श्लोकांचे मैत्रीचे संबंध होते.

त्याच सोबत निता अंबानी देखील श्लोकाला आधीपासूनच ओळखत होत्या. निता अंबानी या आकाशसाठी श्लोका पेक्षा चांगली मुलगी मिळुच शकत नाही अशा बोलल्या होत्या.

आणि शेवटी त्यांनी श्लोकाला अंबानी कुटुंबांची सून केली. निता अंबानी यांना श्लोका मेहता ही आकाशसाठी परफेक्ट आहे असे नेहमी वाटायचे. श्रीमंतांच्या घरात देखील सुनेसोबतचे वागणे हे खूप सर्वसाधारण असते.

परंतु अंबानी कुटुंबाने आकाशसाठी एक अशी मुलगी निवडली की तिला फक्त कौटुंबिक मुल्याचीच जाणीव चांगली जाण नसेल, तर कुटुंबातील सर्व पद्धती ही ती नीट पार पडेल.