अहमदनगर Live24 टीम, 04 जानेवारी 2022 :- शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्यामध्ये भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर आरोप करण्यात आला आहे.

नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग सेशन कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. कोर्टाने सुनावणीदरम्यान नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता.

दरम्यान नितेश यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी पार पडणार आहे. दरम्यान भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्यामध्ये सिंधुदुर्ग पोलीस चौकशी करत आहेत. या चौकशीमध्ये आमदार नितेश राणे यांचेही नाव आले आहे.

त्यामुळे त्यांच्या अटकेची शक्यता निर्माण झाली होती. अटक टाळण्यासाठी नितेश राणेंचे वकील अ‍ॅड. संग्राम देसाई यांनी सिंधुदुर्ग सेशन कोर्टात अर्ज केला होता.

सुमारे तीन दिवस चाललेल्या दोन्ही बाजूच्या युक्तिवादानंतर सिंधुदुर्ग सेशन कोर्टाने नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता.

कोर्टाच्या या निर्णयाविरोधात आमदार नितेश राणेंनी हायकोर्टात धाव घेतली आहे. नितेश राणेंच्या अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.

या याचिकेवर आज मंगळवार ४ जानेवारी २०२२ रोजी तातडीची सुनावणी ठेवण्यात आली आहे. दरम्यान नितेश राणे यांना दिलासा मिळणार कि नाही याबाबत आज फैसला होणार आहे.