IRCTC Tour Package : भारतीय रेल्वे (Indian Railway) आपला महसूल वाढवण्यासाठी पर्यटनावर लक्ष केंद्रित करत आहे. आयआरसीटीसी (IRCTC) सतत आपल्या वेगवेगळ्या पॅकेजेसद्वारे लोकांना खुश करत असते.

असेच एक पॅकेज आयआरसीटीसी (IRCTC Package) घेऊन आली आहे. यामध्ये पवित्र धार्मिक स्थळांवर (Religious places) नेले जाणार आहे.

या पॅकेजअंतर्गत तुम्हाला अयोध्या (Ayodhya), चित्रकूट, हम्पी, जनकपूर, नंदीग्राम, नाशिक, प्रयागराज, रामेश्वरम, सीतामढी, वाराणसी (Varanasi)इत्यादी अनेक ठिकाणी नेले जाईल.

या पॅकेजअंतर्गत तुम्हाला 17 रात्री आणि 18 दिवस फिरण्याची संधी मिळणार आहे. हे पॅकेज 18 नोव्हेंबर 2022 पासून दिल्लीपासून सुरू होत आहे. यामध्ये तुम्हाला 3rd AC मध्ये प्रवास करण्याची संधी मिळेल.

प्रवासात तुम्हाला खाण्यापिण्याची काळजी करण्याची गरज नाही. तुमच्या खाण्यापिण्यापासून ते तुमच्या राहण्यापर्यंतची संपूर्ण व्यवस्था IRCTC कडून केली जाईल. या पॅकेजमध्ये तुम्हाला विम्याची सुविधाही मिळेल.

दुसरीकडे, भाड्याबद्दल बोलायचे झाले तर, जर तुम्ही एकटेच प्रवास करणार असाल. तर तुम्हाला 68,980 रुपये खर्च करावे लागतील. दुसरीकडे, दोन लोकांसोबत प्रवास करण्यासाठी प्रति व्यक्ती 59,980 रुपये मोजावे लागतील. तसेच तुम्ही तीन लोकांसोबत प्रवास करणार असाल तर, तुम्हाला प्रति व्यक्ती 53,985 रुपये खर्च करावे लागतील.