अहमदनगर Live24 टीम, 09 नोव्हेंबर 2021 :- एसटी बससेवा कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यासाठी आंदोलन करून संप पुकारला आहे. यामुळे ऐन दिवाळीत राज्यात बससेवा ठप्प झाली आहे. यामुळे प्रवाश्यांचे अतोनात हाल होत आहे.

संप काही केल्या मिटत नसल्याने अखेर शाससाने यावर उपाय म्हणून आता खासगी वाहनचालकांना प्रवासी वाहतुकीसाठी अधिकृत परवानगी दिली आहे. शालेय बस, कंपनीच्या बस आणि खासगी बससह मालवाहतूक खासगी वाहनांना प्रवाशांची ने आण करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

या निर्णयामुळे तब्बल २०-२५ हजार बस प्रवासी वाहतुकीसाठी उपलब्ध होणार होणार आहेत. ही परवानगी तात्पुरती असल्याचे शासन म्हणत आहे. संपाच्या कालावधीत प्रवासी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी शासनाने उपाययोजना आखण्यास सुरुवात केली.

या पार्श्वभूमीवरच सर्व खासगी प्रवासी बसेस, स्कूल बसेस, कंपनीच्या मालकीच्या बसेस, मालवाहू वाहने यांना प्रवासी वाहतूक करण्यास मान्यता देण्यात आली आहे. 8 नोव्हेंबर 2021 च्या मध्यरात्रीपासून ही मंजुरी देण्यात आली असून संप, आंदोलन मागे घेईपर्यंत हा नियम लागू असणार आहे.

दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा आणि लोकांना वेठीस धरू नये, असे आवाहन राज्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी केले आहे.

राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलनावर उद्धव ठाकरे शासनाने प्रभावी उपाय काढला असे म्हणावे की पूर्ण हयात कमी पगारावर आयुष्य जनतेसाठी झिजवणार्या कर्मचाऱ्यांना उद्धव ठाकरे सरकारने दिलेली ही दीपावली भेट आहे का हे समजण्याच्या पलीकडे आहे.