अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2021 :-  काही दिवसांपूर्वी मायलेकी शेतात काम करण्यासाठी गेल्या होत्या. तेव्हा पिण्यासाठी विहीरीतुन पाणी काढताना मुलगी पाय घसरून विहीरीत पडली.

तिला वाचवण्यासाठी तिच्या आईने विहिरीत उडी घेतली होती. मात्र या घटनेत दोघी मायलेकींचा करुन अंत झाला होता. दरम्यान या घटनेचा विसर पडत नाही तोच पुन्हा त्याच कुटूंबामधील एकुलता एक मुलाचाही विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला.

ही घटनाघटना पाथर्डी तालुक्यातील मुंगुसवाडे येथे घडली. राम नारायण हिंगे (वय १३ ) असे मृत झालेल्या मुलाचे नाव आहे. दरम्यान या मुलाच्या आईसह बहिणीचा काही दिवसांपूर्वीच विहिरीत बुडून दुर्दैवी अंत झाला होता.

या घटनेला काही दिवस लोटत नाही तोच हि दुर्दैवी घटना घडल्याने सर्वत्र मोठी हळहळ व्यक्त होत आहे.मयत राम हिंगे हा इयत्ता ८ वी मध्ये शिक्षण घेत होता.

तो आज शाळेत जाण्याऐवजी शेतात काम करण्यासाठी गेला होता. यावेळी त्याचा विजेचा शाँक लागल्याने जागीच मृत्यू झाला. दरम्यान हिंगे कुटूंबासाठी स्वतःचे शेतच कर्दनकाळ ठरले आहे.