अहमदनगर Live24 टीम, 28 सप्टेंबर 2021 :-  रविवारी रात्री जिल्ह्यातील अनेक भागात चांगला पाऊस झाला आहे. या पावसाने काही भागात मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झाले आहे.

अशीच काहीशी चमत्कारिक घटना पारनेर तालुक्यातील वडनेर हवेलीमध्ये घडली आहे. या पावसात येथील सुभाष बबन बढे या शेतकऱ्याच्या राहत्या घरावर वीज कोसळलीसुदैवाने कुठलेही जीवितहानी झाली नाही.

मात्र घराचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार वडनेर हवेली येथील सुभाष बबन बढे यांच्या घरावर रात्री १ वाजण्याच्या सुमारास वीज कोसळली यावेळी सुभाष बढे आपल्या पत्नी व मुलासह या घरात झोपले होते.

सुदैवाने घरातील कोणत्याही सदस्याला कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही. मात्र घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दरम्यान वीज पडल्याची माहिती मिळाल्या नंतर वडनेर हवेलीचे सरपंच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना धीर दिला.