अरे देवा..! आता ‘तूर’ उत्पादक शेतकरी अडचणीत: अतिरिक्त तुरीचे करायचे काय?

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 08 जानेवारी 2022 :- यंदाच्या खरीप हंगामातील शासकीय तूर खरेदीला लवकरच सुरुवात होणार आहे. शासनाने घोषित केलेल्या हमी भावानुसार शासकीय तूर खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी उत्पादित केलेली तूर खरेदी केली जाणार आहे.

कृषी विभागाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे तूर खरेदी केंद्रावर तुरीची खरेदी केली जाते. कृषी विभागाच्या प्रथम पीक कापणी अंदाजानुसार तूर पिकाची हेक्टरी उत्पादकता ठरविण्यात आली असून,

हंगाम २०२१ – २२ साठी अहमदनगर जिल्ह्यासाठी ५५० किलो प्रति हेक्टर एवढी घोषित करण्यात आल्याने, तूर उत्पादकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे अतिरिक्त झालेल्या उत्पादनाचे करायचे काय? या चिंतेत शेतकरी सापडला आहे.

चालू हंगामात अतिवृष्टीने खरीप पिकाचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन मिळाले नाही. तुरीच्या पिकामधून झालेला खर्च मिळेल या आशेवर शेतकरी असताना,

कृषी विभागाच्या आकडेवारीमुळे शेतकऱ्यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाल्याने, शेतकऱ्यांना खाजगी व्यापाऱ्यांना तुर विकावी लागत असल्याने शेतकऱ्यांकडून हमी भावापेक्षा कमी दराने तुरीची खरेदी केली जात असल्यामुळे तोटा सहन करावा लागत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!