Ahmednagar Crime : दुकानासमोरील जाहिरात का लावले असे म्हणत सहा जणांच्या टोळक्याने येथे बॅनर लावायचे नाही असे म्हणून शिवीगाळ करून दोघांना लाथाबुक्क्यांनी तोंडावर, पाठीवर छातीवर जबर मारहाण करत जीवे मारण्याच्या उद्देशाने एकाला तब्बल तीन वेळा उचलून जमिनीवर आपटून जखमी केल्याची घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सुरज अशोक निमोणकर व त्याचा मित्र विकास कचरू साळुंके हे जाहिरात चिटकावीत होता. सुरज हा कटर आणण्यासाठी दुसऱ्या दुकानात गेला असता, त्यावेळेस कैलास माने तेथे आला व त्याने साळुंके यास शिवीगाळ करून येथे बॅनर चिटकावयाचे नाही असे सांगत मी तीन वर्षे उगाच झेल भोगून आलो आहे का असे म्हणून कोणाला तरी फोन केला.

थोड्याच वेळात मोटारसायकलवरून तुषार हनुमंत पवार, बबलु जाधव व राहूल माने (पूर्ण नाव माहीत नाही) व इतर दोन अनोळखी तिथे पायी चालत आले. व त्यांनी माने यास विचारले कोण आहे तेव्हा माने याने ते दोघे आहेत त्यांना जिवे मारून टाका जिवंत सोडू नका असे म्हणताच बबलु जाधव याने विकास साळुंके याच्या तोंडावर चापट मारली तर राहूल माने याने छातीवर लाथ मारली तर तुषार हनुमंत पवार याने विकास यास जिवे मारण्याच्या उद्देशाने तीन वेळा उचलून जमिनीवरील ब्लॉकवर आदळले व लाथाबुक्क्यांनी त्याच्या तोंडावर पोटावर मारुन जखमी केले.

तसेच दोन अनोळखी यांनी विकास यास उचलून आपटले. इतरांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्यामुळे छातीवर, तोंडावर व कमरेवर मार लागला. यावेळी इतर लोक सोडवण्यासाठी आले असता त्यांना शिवीगाळ करून हाकलून दिले. व जाताना म्हणाले पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यास गोळ्या घालून ठार मारू असे म्हणून निघून गेले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.