अहमदनगर Live24 टीम, 01 जानेवारी 2022 :-  महाराष्ट्रावर कोरोनाचे संकट गडद होत असताना त्यातच कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटनेही चिंता वाढवली आहे. दैनंदिन रुग्णसंख्येत सातत्याने वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.

देशात सर्वाधिक ओमायक्रॉनचे रुग्ण महाराष्ट्रात आहेत. राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी राज्यात सहा नव्या ओमायक्रॉन रुग्णाची भर पडली आहे. तर आतापर्यंत 180 रुग्णांनी ओमायक्रॉनवर मात केली आहे.

यामध्ये पुणे ग्रामीणमधील तीन रुग्णाचा, पिपरी चिचंवड मनपामधील दोन रुग्णाचा तर पुणे मनपामधील एका रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे राज्यातील ओमायक्रॉनबाधित रुग्णाची संख्या 460 इतकी झाली आहे.

४६० पैकी २६ रुग्ण इतर राज्यातील आहेत. तर 9 रुग्ण विदेशी नागरिक आहेत. तसेच प्रत्येकी १ रुग्ण पालघर, जळगाव, नवी मुंबई,‍नाशिक, रायगड आणि औरंगाबाद येथील आहे.

सात रुग्ण ठाणे आणि चार रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. तर 9 रुग्ण विदेशी नागरिक आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हे रुग्ण आढळले आहेत.

राज्यात कुठे किती रुग्ण?

अ.क्र. जिल्हा /मनपा आढळलेले एकूण ओमायक्रॉन रुग्ण

१ – मुंबई – ३२७

२ – पिंपरी चिंचवड – २८

३ – पुणे ग्रामीण – २१

४ – पुणे मनपा – १३
५ – ठाणे मनपा – १२
६ – नवी मुंबई, पनवेल – प्रत्येकी ८

७ – कल्याण डोंबिवली – ७
८ – नागपूर आणि सातारा – प्रत्येकी ६
९ – उस्मानाबाद – ५
१० – वसई विरार – ४
११ – नांदेड – ३
१२ – औरंगाबाद, बुलढाणा, भिवंडी निजामपूर मनपा, मीरा भाईंदर – प्रत्येकी २
१३ – लातूर, अहमदनगर, अकोला, कोल्हापूर – प्रत्येकी १

एकूण – ४६०