अहमदनगर Live24 टीम, 02 जानेवारी 2022 :- राज्यात आज दिवसभरात तब्बल 9 हजार 170 नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. गेल्या काही महिन्यांमधील ही सर्वात मोठी रुग्णवाढ मानली जात आहे.(corona news)

विशेष म्हणजे आज मृत्यूचा आकडाही 7 वर पोहोचला आहे. महाराष्ट्रातील मोठ्या आणि महत्त्वाच्या शहरांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे.

महाराष्ट्रात काल दिवसभरात 8,067 नवे रुग्ण आढळले आहेत. तर आज हाच आकडा 9 हजार 170 वर पोहोचला आहे. त्यापैकी मुंबई शहरातच 6347 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

दरम्यान राज्यातील सध्याचा मृत्यूदर हा 2.19 टक्के इतका आहे. तर दिवसभरात 1445 रुग्णांनी कोरोनावर मात केलेली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97.35 टक्के इतकं आहे.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आज दिवसभरात 6 नवे ओमायक्रोनबाधित रुग्ण आढळले आहेत. यामध्ये पुणे ग्रामीण येथील 3, पिंपरी चिंचवड येथील 2 तर पुण्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. राज्यातील ओमायक्रोनबाधितांचा आकडा 460 वर पोहोचला आहे.