अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2021 :- अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी जागीच ठार झाल्याची घटना संगमनेर तालुक्यातील कर्जुले पठार येथे घडली आहे. मंगळवारी रात्री साडे सात वाजेच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली.(Ahmednagar Accident)

याबाबत अधिक माहिती अशी कि, संगमनेर तालुक्यातील नाशिक पुणे महामार्गावरील कर्जुले पठार येथे महामार्ग ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

अनिल लहानू अरगडे वय ३८ वर्ष असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अपघातातील वाहन चालक वाहन घेऊन पसार झाला.

घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल आदिनाथ गोंधले यांनी या घटनेचा तपास सुरु केला आहे. या पसार अज्ञात वाहनाचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.