अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2021 :- जमिनीच्या वादातून अनेकदा खुनासारखे गंभीर प्रकार घडत आहेत. अशीच काहीशी घटना पाथर्डी तालुक्यात घडली आहे. यात विहिरीवरील वीजपंप सुरु करण्याच्या झालेल्या किरकोळ वादातून थेट एकाच्या डोक्यात धारदार शस्त्राने घाव घालुन खून केला.(Ahmednagar Crime)

खून केल्यानंतर सदरचा मृतदेह विहिरीत टाकुन देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. भागवत गर्जे असे या घटनेतील मृत व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, भागवत गर्जे यांच्या वडिलांनी आरोपी बडे याची खरेदी केली होती. यांच्यात जमिन व विहिरीच्या पाण्यावरुन वाद होत होते.

स्थानिक पातळीवर हे वाद मिटविलेले होते. परंतु मतभेद होतेच. काल रात्री भागवत गर्जे हा शेतात पाणी देण्यासाठी गेला होता. वीजरोहीत्राची फ्युज गेल्याने

ती बसवून तो विहिरीवर आला दरम्यान तेथे दबा धरुन बसलेला बडे याने भागवत गर्जे याच्यावर धारदार शस्त्राने वार केला. डोक्याच्या मागच्या बाजुला वार केल्याने भागवत जमिनीवर पडला.

त्यानंतर त्याला बडे याने विहिरीत टाकले त्यानंतर बडे हा पळून गेला.दरम्यान गर्जे घरी न आल्याने त्याचा शोध घेतला असता भागवतचा मृतदेह विहिरीत आढळुन आला. याबाबत संजय गर्जे याने पोलिसात फिर्याद दिली आहे.