अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2022 :-  राहाता बाजार समितीत गुरुवारी कांद्याच्या6811 गोण्यांची आवक झाली.

प्रतिक्विंटल कांद्याला जास्तीत जास्त 2600 रुपये इतका भाव मिळाला तर सोयाबीनला जास्तीत जास्त 6311 रुपये इतका भाव मिळाला.

राहाता बाजार समितीत 6 हजार 811 कांद्याच्या गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर 1 ला 2200 ते 2600 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 1450 ते 2150 रुपये, कांदा नंबर 3 ला उन्हाळी 600 ते 1400 रुपये भाव मिळाला.

गोल्टी कांद्याला 1700 ते 1900 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला 100 ते 500 रुपये भाव मिळाला. सोयाबीनची 26 क्विंटल आवक झाली.

सोयाबीनला कमीत कमी 5701 रुपये, तर जास्तीत जास्त 6311 रुपये व सरासरी 6250 इतका भाव मिळाला. चिकूला जास्तीत जास्त 2050 रुपये तर डाळिंबाला प्रति क्विंटलला कमीत कमी 500 तर जास्तीत जास्त 5000 व सरासरी 2750 रुपये असा भाव मिळाला