अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2021 :- संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील खंदरमाळवाडी येथील विनीत सुभाष करंजेकर या शेतकर्‍याचा चार एकर शेतातील लाल कांदा सडून गेला असून अवघा साठ गोणी कांदा निघाला आहे.(Ahmednagar onion news) 

यातून साधा खर्चही वसूल होणार नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, खंदरमाळ येथील कांदा उत्पादक विनीत करंजेकर या तरुण शेतकर्‍याने चार एकर शेतात तीन-चार महिन्यांपूर्वी लाल कांद्याची लागवड केली होती.

मात्र मध्यंतरी अवकाळी पाऊस, सततचे धुके अशा वातावरणाच्य लहरीपणामुळे कांद्यावर प्रतिकूल परिणाम झाला. सध्या कांदा काढणी सुरू आहे. मात्र, सर्रासपणे सडका निघत आहे.

त्यामुळे वैतागून करंजकर यांनी तब्बल चार एकर शेतातच टाकून दिला आहे. अवघा ऐंशी गोणी चांगला कांदा चांगला निघाला त्यातून उत्पादन खर्चही सुटणार नसल्याचे करंजेकर यांनी सांगितले.

दरम्यान कोरोना, अवकाळी, लहरी हवामान अशा एकामागून एक संकटांनी आधीच शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. त्यात बाजारभाव देखील नाही. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी वैतागले आहे.