अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2022 :- गँस गळतीमुळे स्फोट होवुन गंभीर जखमी झालेल्या शेलार कुटुंबातील नमश्री या मुलीचा उपचार सुरु असताना आज सकाळी दुर्दैवी मृत्यू झाला .

श्रीरामपूर तालुक्यातील बेलापुर येथील गाढे गल्लीत राहणारे शशिकांत अशोक शेलार यांच्या घरात गँस गळतीमुळे मोठा स्फोट झाला होता.

त्यात घरातील चौघेही गंभीर भाजले होते त्यांना प्रथम कामगार हाँस्पीटल व नंतर प्रवरा नगर येथे हलविण्यात आले होते.

यातील शशिकांत शेलार यांची मुलगी नमश्री वय वर्ष ९ हीचे उपचार सुरु असतानाच आज सकाळी निधन झाले तिच्यावर शेलार स्मशानभुमित अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

दरम्यान शेलार कुटुंबीयातील तिघावर अजुनही प्रवरानगर येथील दवाखान्यात उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.