Optical Illusion : इंटरनेटवर (Internet) काही अशी चित्रे किंवा फोटो (Photo) व्हायरल (viral) होत असतात त्यामध्ये काहीतरी लपलेले असते पण ते आपल्या डोळ्यांना दिसत नाही. त्यामधील लपलेली वस्तू समजण्यासाठी बराच वेळ जात असतो. डोळ्यांसमोर असते पण ते दिसत नाही.

ऑप्टिकल इल्युजनच्या आणखी एक छायाचित्र सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाले आहे. ऑप्टिकल इल्युजनच्या प्रतिमा दररोज इंटरनेटवर व्हायरल (Viral) होतात आणि लोक ही चित्रे पाहून त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करतात.

आज तुमच्यासाठी आणलेल्या छायाचित्रात झाडावर एक छोटा पक्षी बसलेला आहे. तो अशा ठिकाणी लपून बसलेला असते की तो शोधूनही सापडत नाही. झाडावर उगवलेली पाने आजूबाजूला दिसतात, पण या पानांमध्ये पक्षीही दडलेला आहे. आपल्याला फक्त ते शोधण्यावर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे.

ऑप्टिकल इल्युजनशी संबंधित हे चित्र पाहून प्रत्येकजण ते सोडवण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु काही लोकांनाच यश मिळत आहे. सर्व प्रथम, एकाग्र होऊन त्याकडे पूर्णपणे पहा, नंतर त्याच्या उजव्या बाजूला लक्ष ठेवा, तेथे तुम्हाला एक पक्षी दिसेल. पानांच्या रंगामुळे पक्षी शोधणे कठीण झाले आहे.

जर तुम्हाला या चित्रातला पक्षी बिनदिक्कत सापडला असेल तर नक्कीच तुमचे डोळे आणि मनही तीक्ष्ण आहे. भविष्यातही आम्ही अशाच ऑप्टिकल इल्युजनचे चित्र तुमच्यासाठी घेऊन येऊ. नेहमीप्रमाणे तुम्हाला ती चित्रे सोडवायला मजा येईल.