Optical Illusion : इंटरनेटवर (Internet) काही अशी चित्रे किंवा फोटो (Photo) व्हायरल (viral) होत असतात त्यामध्ये काहीतरी लपलेले असते पण ते आपल्या डोळ्यांना दिसत नाही. त्यामधील लपलेली वस्तू समजण्यासाठी बराच वेळ जात असतो. डोळ्यांसमोर असते पण ते दिसत नाही.

ऑप्टिकल इल्युजनच्या आणखी एक छायाचित्र सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाले आहे. ऑप्टिकल इल्युजनच्या प्रतिमा दररोज इंटरनेटवर व्हायरल (Viral) होतात आणि लोक ही चित्रे पाहून त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करतात.

पानांमध्ये लपली आहे मगर

तुमच्या चित्रात एक नदी दिसेल आणि पानांमध्ये एक मगर आहे, जर तुम्हाला ती 20 सेकंदात सापडली तर तुमच्यापेक्षा मोठा चॅम्पियन कोणीही नाही. पण पानांमध्ये लपलेली मगर शोधणे इतके सोप्पे नाही.

मगर कुठे लपली आहे

इतके इशारे देऊनही जर तुम्हाला या चित्रातून मगर (crocodile) सापडली नसेल, तर निराश व्हायची गरज नाही कारण बहुतांश लोकांना यात यश आलेले नाही. या चित्राच्या डाव्या बाजूला हिरव्या पानांवर लक्ष केंद्रित करा, तुम्हाला तिथे मगरीचा डोळा दिसेल. अशा प्रकारे हा पहिला देखील सोडवला.

जर तुम्ही पहिल्या दृष्टीक्षेपात गूढ उकलले असेल तर तुमचे मन आणि डोळे निश्चितच तीक्ष्ण आहेत. मगर शोधण्यात तुम्ही यशस्वी झाला नसाल तर खालील चित्रात तुम्ही मगर पाहू शकता.