Optical Illusions : इंटरनेटवर (Internet) काही अशी चित्रे किंवा फोटो (Photo) व्हायरल (viral) होत असतात त्यामध्ये काहीतरी लपलेले असते पण ते आपल्या डोळ्यांना दिसत नाही. त्यामधील लपलेली वस्तू समजण्यासाठी बराच वेळ जात असतो. डोळ्यांसमोर असते पण ते दिसत नाही.

ऑप्टिकल इल्युजनच्या आणखी एक छायाचित्र सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाले आहे. ऑप्टिकल इल्युजनच्या प्रतिमा दररोज इंटरनेटवर व्हायरल (Viral) होतात आणि लोक ही चित्रे पाहून त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करतात.

या चित्रात मोठे दगड आणि गवत आहेत. ज्यात एक पक्षी डोळ्यासमोर बसला आहे. मात्र त्यानंतरही हा पक्षी कोणालाच सापडलेला नाही. फोटोसमोर बसलेला पक्षी शोधण्यात भल्याभल्यांचा घाम सुटला आहे.

जर तुम्ही स्वतःला अलौकिक बुद्धिमत्ता मानत असाल तर पक्षी शोधा आणि दाखवा. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ऑप्टिकल इल्युजनच्या या चित्राकडे मोठ्या संख्येने लोकांनी आपले मत मांडले, परंतु काही वगळता इतर कोणालाही योग्य उत्तर देता आले नाही.

जर तुम्हाला अद्याप फोटोमध्ये पक्षी सापडला नसेल तर घाबरू नका कारण येथे तुम्हाला फोटोमध्ये पक्षी कुठे लपला आहे हे सांगणार आहोत. खरे तर पक्षी आणि दगड यांचा रंग सारखाच असतो त्यामुळे त्यांना शोधणे फार कठीण आहे.

तथापि, आपण चित्राकडे काळजीपूर्वक पाहिले तर एका कोपऱ्यात खाली डावीकडे पक्ष्याचा आकार दिसेल. पक्षी एका मोठ्या दगडावर चेहरा उलटा करून आरामात बसलेला दिसतो.