अहमदनगर Live24 टीम, 19 एप्रिल 2022 Organic Farming  :- काही महिन्यांपूर्वी मोदी सरकारच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्याला व शेती व्यवसायाला (Agriculture) केंद्रस्थानी ठेवण्यात आले होते.

त्या अर्थसंकल्पात नैसर्गिक शेतीला जास्त महत्त्व देखील दिले होते. रासायनिक खतांच्या (Chemical Fertilizer) अनिर्बंध वापरामुळे जमिनीचे आरोग्य, मानवाचे आरोग्य तसेच पर्यावरण मोठ्या संकटात सापडत आहे.

रासायनिक खतांच्या अनिर्बंध वापरात महाराष्ट्र शीर्षस्थानी येतो त्यामुळे ही निश्चितच चिंतेची बाब ठरत आहे. राज्यातील अनेक शेतकरी बांधव आता सेंद्रिय शेतीकडे (Organic Farming) मोठ्या आशेने बघू लागले आहेत त्यामुळे आगामी काही दिवसात निश्चितच सेंद्रिय शेतीला चालना मिळणार असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.

मायबाप सरकार तसेच कृषी क्षेत्रातील जाणकार लोक, शेतकऱ्यांना शेतात रासायनिक खतांऐवजी सेंद्रिय खतांचा (Organic Fertilizer) वापर करण्याचा सल्ला वारंवार देत असतात.

सेंद्रिय खतांचा वापर केल्यास जमिनीची खत क्षमता टिकून राहण्याबरोबरच प्रदूषणमुक्त धान्य लोकांपर्यंत पोहोचेल. यामुळे मानव सर्व प्रकारच्या आजारांपासून दूर राहू शकतो.

केळीच्या झाडाचे अवशेष निरुपयोगी असल्याचे समजून अनेकदा शेतकरी शेतातच टाकून देतात. आपल्या खानदेशात देखील केळीची शेती मोठ्या प्रमाणात होते आणि शेतकरी बांधव केळीची काढणी झाल्यानंतर केळीची अवशेष जसे की खोड,पाने इत्यादी फेकून देतात.

यामुळे पर्यावरण तर बिघडतेच, पण मातीचा पोत देखील खराब होतो. ही परिस्थिती टाळण्यासाठी शेतकरी निरुपयोगी केळीच्या खोडापासून सेंद्रिय खत तयार करून चांगला नफा कमवू शकतात. सीतापूरचे राहुल सिंग मोठ्या प्रमाणावर केळीची लागवड करतात.

ते सांगतात की, पूर्वी येथेही बहुतांश शेतकरी केळी निरुपयोगी समजून अशी फेकून देत असत. दुर्गंधीमुळे आजूबाजूला येणे-जाणे अवघड होते, मात्र आता परिसरातील बहुतांश शेतकरी जागरूक झाले आहेत.

केळीच्या देठापासून तो आता सेंद्रिय खत बनवत आहे. शेतकरी मित्रांनो जर आपण देखील केळीच्या खोडापासून सेंद्रिय खत तयार करण्याच्या विचारात असाल तर सेंद्रिय खत तयार करण्याची पद्धत आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत.

सेंद्रिय खत तयार करण्यासाठी एक खड्डा तयार केला जातो. ज्यामध्ये केळीची देठ टाकली जातात. मग त्यात शेण आणि तणही, पालापाचोळा टाकला जातो.

यानंतर, डिकंपोजरची फवारणी केली जाते. थोड्याच वेळात, याचे सेंद्रिय खत तयार होते, ज्याचा वापर करून शेतकरी त्यांचे उत्पन्न वाढवू शकतात.

यामुळे पीक वाढण्यास मदत होतं असते. कृषी क्षेत्रातील जाणकार लोक सांगतात की, शेतकऱ्यांनी शेतात रासायनिक खतांचा वापर कमी करावा.

रासायनिक खताऐवजी अशी सेंद्रिय खते तयार करून वापरावीत. निश्चितच सेंद्रिय खतांचा वापर केल्यामुळे जमिनीचे आणि मानवाचे आरोग्य अबाधित ठेवण्यास मदत होणार आहे.