file photo

अहमदनगर Live24 टीम, 05 ऑक्टोबर 2021 :- नगर शहरातील रस्त्याची विदारक व भयानक परिस्थिती झाली असून शहर शिवसेनेच्या वतीने आयुक्त शंकर गोरे यांना घेराव घालण्यात आला व शहराच्या खड्डयांसंदर्भात जाब विचारण्यात आला.

दिवाळीपूर्वी शहरातील खड्ड्यांचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा अधिकाऱ्यांना खड्डयांमध्ये झोपवण्याचा इशारा शिवसेना शिष्टमंडळाने दिला.

नगर शहराच्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, यापूर्वी नगरकरांनी अशाप्रकारे रस्त्याची अत्यंत विदारक व भयानक परिस्थिती कधीही पाहिली नाही.

या नगर शहराच्या खड्ड्याचा प्रश्नांवर सोशल मीडियावर नगरसेवक, राजकीय नेते व मनपा अधिकारी यांच्यावर कमेंट चालू आहेत. नगर शहरातील एकही रस्ता चांगला राहिलेला नाही व शहरातील अनेक संघटनांच्यावतीने निवेदने व आंदोलन झाले

असून देखील कोणताही रस्ता पॅचिग कामासाठी करण्यास प्रशासन तयार नाही. शहरातील काही दिवसांपूर्वीच खड्ड्याचे पॅचिग काम केलेले आहे व ते संपूर्णपणे वाहून गेलेले आहे.

भुयारी गटार मार्गाचे काम चालू आहे, यामध्ये भुयारी गटारसाठी खोदलेला रस्ता, त्याला पॅचिंग करून बुजवणे, त्यानंतर त्याचे बिल काढणे अशी निविदेमध्ये अट असताना देखील त्याचे कोट्यवधीचे बोगस पॅचिंगचे बिल काढण्यात आल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.