अहमदनगर Live24 टीम, 04 मे 2022 Krushi news :  देशात मोठ्या प्रमाणात भातशेती (Paddy Farming) केली जाते. आपल्या राज्यातही (Maharashtra) भात शेती उल्लेखनीय आहे.

राज्यातील कोकणात (Konkan) भात शेतीचे (Paddy Cultivation) क्षेत्र विस्तारलेले आहे. येथील शेतकरी बांधव (Farmer) मोठ्या प्रमाणात भात शेती करत असतात.

भात उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Paddy Growers) आनंदाची बातमी आता समोर येऊ लागली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, देशातील वैज्ञानिकांनी (Indian Scientists) भाताची एक नवीन जात (Paddy New Variety) विकसित केली आहे.

यामुळे भात उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याचे सांगितले जात आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, आयआर-64-इंडिका या भाताच्या जातीची सर्वाधिक लागवड केली जाते.

यामुळे भारतीय वैज्ञानिकांनी या ‘आयआर-64-इंडिका’ या तांदळाच्या वाणात एका वन्य प्रजातीच्या तांदळातील जनुक समाविष्ट करून एक नवे-कोरे प्रगत वाण विकसित केले आहे. यामुळे निश्चितच भात उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

भाताच्या नवीन वाणाचे वैशिष्ट्ये मित्रांनो वैज्ञानिकांनी विकसित केलेल्या या नवीन वाणाचे वैशिष्ट्य असे आहे की हे नवीन वाण खाऱ्या पाण्यात देखील लावले जाऊ शकते आणि विशेष म्हणजे यापासून चांगले उत्पादन देखील घेतले जाऊ शकते.

मित्रांनो ज्या जंगली प्रजातीमधील जनुक यामध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत त्या वनस्पतीला वनस्पतीशास्त्रात ‘पोटरेशिया कॉरक्टाटा’ असे म्हणतात आणि याची शेती प्रामुख्याने बांगलादेशातील नद्यांच्या खाऱ्या पाण्याच्या मुखात केली जाते. यामुळे ही नवीन वाण खाऱ्या पाण्यात उत्पादन देण्यास सक्षम आहे असा वैज्ञानिकांचा दावा आहे.

विशेष म्हणजे ही जंगली प्रजाती फक्त बांगलादेश मध्ये आढळते असे नाही तर भारत, श्रीलंका आणि म्यानमारमध्ये देखील नैसर्गिकरीत्या ही तांदळाची प्रजाती सापडत असते.

पश्चिम बंगालमधील कोलकत्ता येथील जगदीशचंद्र बोस इन्स्टिट्यूटचे प्रमुख संशोधक डॉ. अरुणेंद्र नाथ लाहिरी मुजुमदार यांनी याविषयी अधिक माहिती देताना याविषयी उलगडा केला आहे.

डॉ. अरुणेंद्र नाथ लाहिरी मुजुमदार म्हणाले की, ही नव्याने विकसित केलेली प्रजाती 200 मायक्रोमोल प्रति लिटरपर्यंतच्या खाऱ्या पाण्याला सहन करू शकते म्हणजे 200 मायक्रोमोल प्रति लिटरपर्यंतच्या खाऱ्या पाण्यात देखील याचे यशस्वी उत्पादन घेतले जाऊ शकते.

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, समुद्राच्या पाण्यात मिठाचे प्रमाण हे जवळपास 480 मायक्रोमोल प्रतिलिटर असते.

याचा अर्थ समुद्रापेक्षा निम्म्याने जरी खारे पाणी असले तरी देखील या भाताच्या वाणाची अशा पाण्यात लागवड करता येणे शक्य होणार आहे.

निश्‍चितच देशातील भात उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. ज्या प्रदेशातील पाणी अधिक खारट आहे अशा प्रदेशात या भाताच्या वाणाची लागवड आता मोठ्या प्रमाणात बघायला मिळू शकते. निश्चितच वैज्ञानिकांनी विकसित केलेली ही नवीन वाण भात उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची पर्वणी सिद्ध होणारी आहे.