दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी… ‘या’ दिवशीपासून मिळणार हॉलतिकिट

10th examination

अहमदनगर Live24 टीम,  17 फेब्रुवारी 2022 :- दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वपूर्ण बातमी आहे. १५ मार्च २०२२ पासून सुरू होणार्‍या दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना हॉलतिकिट १८ फेब्रुवारीपासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हॉलतिकीट लॉग इनमध्ये उपलब्ध झाल्यावर त्याची प्रिंट शाळांनी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यायची आहेत. दहावीची परीक्षा येत्या १५ मार्चपासून सुरू होणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे … Read more

सात वर्षापूर्वी अपहरण झालेल्या मुलीबद्दल खळबळजनक माहिती समोर !

अहमदनगर Live24 टीम,  17 फेब्रुवारी 2022 :- सात वर्षापूर्वी अपहरण झालेल्या मुलीचा व आरोपीचा शोध घेण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला यश आले आहे. आरोपी राहुल सिंग गौंड (रा. कटरा, बलखेडा ता. पाटण जि. जबलपूर, मध्यप्रदेश), अपहृत मुलगी व त्यांच्या दोन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेत एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. दि. २३ सप्टेंबर २०१५ रोजी … Read more

अँड्रॉईड व अॅप्पल कारप्ले कनेक्टीव्हीटीसह येणार एमजी झेडएस ईव्ही २०२२

अहमदनगर Live24 टीम,  17 फेब्रुवारी 2022 :- एमजी मोटरच्या बहुप्रतिक्षित नवीन झेडएस ईव्ही २०२२ च्या नवीन अवतारामध्ये १०.१ इंच एचडी टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम आणि फर्स्‍ट-इन-सेगमेंट अँड्रॉईड व अॅप्पल कारप्ले कनेक्टीव्हीटी असणार आहे. नवीन झेडएस ईव्हीमध्ये एमजीचे जागतिक यू्.के. डिझाइन पैलू सामावलेले आहेत, ज्‍यामुळे सूक्ष्‍मदर्शी ग्राहकांना लेजर व कम्फर्ट आणि लक्झरी घटकांची सुधारित श्रेणी देण्‍यात आली … Read more

Indurikar Maharaj : विखे पाटील परिवारा बद्दल इंदोरिकर महाराज म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम,  17 फेब्रुवारी 2022 :- सरपंच, उपसरपंचांना चहाच्‍या दूकानाला नाव दिलेले सहन झाले नाही, मग राष्‍ट्रपुरुष आणि संताच्‍या नावाच्‍या पाट्या तुम्‍ही सहन कशा करता? असा परखड सवाल समाज प्रबोधनकार निवृत्‍ती महाराज देशमुख यांनी केला. यापुढे कोणत्‍याही दूकानांवर राष्‍ट्रपुरुष आणि संतांची नावे न लावण्‍याचा संकल्‍प शिवजयंतीच्‍या निमित्‍ताने करण्‍याचे आवाहनही त्‍यांनी युवकांना केले. लोणी बुद्रूक … Read more

मोनिका राजळे यांची खरमरीत टीका ! म्हणाल्या बाेट दाखवण्यापेक्षा…

अहमदनगर Live24 टीम,  17 फेब्रुवारी 2022 :-  महाविकास आघाडी सरकार सर्वच बाबतीत अपयशी ठरलेले असताना, स्वतःची चूक झाकण्यासाठी केंद्र सरकारकडे बोट दाखवण्याचा उद्योग करत आहे. यापेक्षा त्यांनी राज्यातील जनतेचे प्रश्‍न सोडविण्याकडे लक्ष द्यावे, अशी खरमरीत टीका आमदार मोनिका राजळे यांनी केली. तालुक्यातील निपाणी जळगाव येथे केंद्र सरकारच्या रस्ते विकास योजने अंतर्गत सुमारे १० कोटी रुपये … Read more

नियती इतकी कशी क्रूर असू शकते? आईचे पांग फेडायचे. हे स्वप्न उराशी बाळगून वाटचाल करत असलेल्या तरुणासोबत झाल…

अहमदनगर Live24 टीम,  17 फेब्रुवारी 2022 :- वडिलांचे छत्र हरपले, आईसह कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर, परिस्थिती हालाखीची पण शिक्षण घेऊन मोठं व्हायचं…आईचे पांग फेडायचे. हे स्वप्न उराशी बाळगून वाटचाल करत असलेल्या साेहेल या तरुणावर काळाने अचानक घाला घातला. एकीकडे व्हॅलेंटाईनच्या दिवशी आई बापांच्या कमाईवर हातात गुलाबाचे फुल घेऊन पोरींच्या मागे धावणारी तरुणाई होती. तर दुसरीकडे साेहेल … Read more

आमदार निलेश लंके म्हणतात आता लक्ष…

अहमदनगर Live24 टीम,  17 फेब्रुवारी 2022 :-  पारनेर नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदी विजय औटी तर उपनगराध्यक्षपदी सुरेखा भालेकर यांची बहुमताने निवड झाली. त्यांना प्रत्येकी दहा मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार, शिवसेनेचे नवनाथ सोबले व विद्या गंधाडे यांना प्रत्येकी सहा मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सुप्रिया शिंदे यांची हृदय शस्त्रक्रिया झाल्यामुळे त्या नगरपंचायतीच्या प्रवेशद्वारात वाहनात थांबल्या. त्यांना … Read more

अहमदनगर ब्रेकींग: पोलिसांनी पकडला सुमारे एक कोटींचा गुटखा ; असा लागला सुगावा…

अहमदनगर Live24 टीम,  16 फेब्रुवारी 2022 :-  कोतवाली पोलिसांनी नगर शहरातील कायनेटीक चौकात दुचाकीवरून गुटखा वाहतुक करणार्‍या दोघांना पकडल्यानंतर तोफखाना पोलिसांच्या हद्दीतील बोल्हेगाव येथील गुटखा गोडाऊनविषयी माहिती मिळाली होती. त्या गोडाऊनवर कोतवाली पोलिसांनी छापा टाकला असता तीन ट्रक गुटखा पोलिसांनी पकडला. बोल्हेगाव परिसरात बुधवारी रात्री पोलिसांनी ही कारवाई केली. रात्री उशिरापर्यंत गुटख्याची मोजदाद सुरू होती. … Read more

Apple कडून मोठी सरप्राईज ! ह्या दिवशी लॉंच होवू शकतो iPhone 14

Apple या वर्षी iPhone 14 सीरीज लाँच करणार आहे. लॉन्च आणखी काही दिवस बाकी आहेत, पण आतापासून फोनबद्दल अनेक अफवा आणि लीक समोर आल्या आहेत. दररोज कुठेतरी, कोणीतरी आयफोनच्या पुढील वैशिष्ट्यांबद्दल, लॉन्चची तारीख इत्यादीबद्दल अंदाज लावताना आढळतो. गेल्या वर्षी आयफोन 13 लॉन्च झाल्यानंतर आयफोन 14 सीरीजची चर्चा सुरू झाली आहे. जसे की आपण सर्व जाणतो … Read more

महापालिका स्थायी समिती सभापतिपदासाठी उद्या निवडणूक होणार

अहमदनगर Live24 टीम,  16 फेब्रुवारी 2022 :-  नगर महापालिका स्थायी समिती सभापतिपदासाठी शुक्रवार (दि.16 फेब्रुवारी) ऐवजी निवडणूक घेण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले या निवडीच्या सभेच्या पिठासीन अधिकारीपदी असतील. दरम्यान स्थायी समिती सभापतिपदासाठी राष्ट्रवादीकडून कुमारसिंह वाकळे यांचे नाव निश्चित झाल्याचे सांगण्यात येते. दरम्यान स्थायी समितीत 16 सदस्य असतात. त्यापैकी आठ सदस्य निवृत्त झाले होते. … Read more

चोरटयांनी शेतकऱ्यांना केले टार्गेट…केबल, मोटरी, झाकणे पाइपची होऊ लागली चोरी

अहमदनगर Live24 टीम,  16 फेब्रुवारी 2022 :-  कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव , सोनेवाडी परिसरात भुरट्या चोरांचा सुळसुळाट झाला आहे. मात्र या चोरटयांनी शेतकऱ्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. पोहेगाव, सोनेवाडी येथील नवले मळ्यातून चांगदेव कांदळकर यांची 700 फूट केबल चोरट्यांनी लांबविली. यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी, तालुक्यातील … Read more

नगर जिल्ह्यातील 22 कारखान्यांकडून 1 कोटी मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण

अहमदनगर Live24 टीम,  16 फेब्रुवारी 2022 :-  नगर जिल्ह्यातील 22 कारखान्यांनी 1 कोटी 4 लाख 71 हजार 128 मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे.जिल्ह्यात ऊस गाळपात अंबालिका व ज्ञानेश्वर साखर कारखाना आघाडीवर आहे. दरम्यान यंदाचे सुरू असलेल्या गळीत हंगामात राज्यातील एकूण 197 साखर कारखान्यांनी 15 फेब्रुवारी 2022 अखेर 829.18 लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप … Read more

पुण्यातील कुख्यात गँगस्टरची पत्नीचा राष्ट्रवादीत प्रवेश

अहमदनगर Live24 टीम,  16 फेब्रुवारी 2022 :- पुणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. यातच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कुख्यात गँगस्टर गजा मारणे याची पत्नी जयश्री मारणे हिने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.यामुळे राजकारणात काही देखील होऊ शकते. याचा प्रत्यय पुणेकरांना आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप … Read more

Sukanya Samriddhi Yojana: सुकन्या समृद्धी योजनेत झाले आहेत हे मोठे बदल, गुंतवणूक करण्यापूर्वी जाणून घ्या नवीन नियम

अहमदनगर Live24 टीम,  16 फेब्रुवारी 2022 :- सन 2015 मध्ये, ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ अभियानांतर्गत, केंद्र सरकारने मुलींच्या चांगल्या भविष्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी सुकन्या समृद्धी योजना सुरू केली होती. या योजनेत तुम्ही तुमच्या मुलीच्या शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी मोठा निधी बनवू शकता.(Sukanya Samriddhi Yojana) या योजनेंतर्गत, पालक किंवा कोणताही पालक एका मुलीच्या नावावर फक्त एकच खाते उघडू शकतो. … Read more

इतका लाचार मुख्यमंत्री पाहिला नाही…नारायण राणेंचे टीकास्त्र

अहमदनगर Live24 टीम,  16 फेब्रुवारी 2022 :- मंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांमधील वाद जगजाहीर आहे. दोघेही एकमेकांवर टीका करण्याची संधी सोडत नाही. यातच नारायण राणे यांनी राज्याचे मुखमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. 56 आमदारांसह मांडीला मांडी लावून बसले आहे. महाराष्ट्राच्या इतिहासांत इतका लाचार मुख्यमंत्री झाला नसेल. इतकी लाज कुणी आणली नाही’ असं … Read more

मनसेचा खासगी शाळांना इशारा…. नाहीतर रस्त्यावर उतरू…

अहमदनगर Live24 टीम,  16 फेब्रुवारी 2022 :-  नागरिकांच्या समस्येसाठी नेहमीच मनसे आक्रमक पणा भूमिका घेत ते सोडवण्यासाठी प्रयत्नशील असतात. यातच कोरोनामुळे प्रदीर्घकाळानंतर शाळा सुरु झाल्या मात्र खासगी शाळांच्या मनमानी कारभाराविरोधात आता मनसे मैदानात उतरली आहे. कॉन्व्हेंट शाळेचा माज खपवून घेणार नाही वेळप्रसंगी रस्त्यावर उतरू अशी आक्रमक भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हा अध्यक्ष सुमित वर्मा … Read more

Free Fire गेम पुन्हा लॉंच होणारा का ? कंपनीने सांगितल…

Garena Free Fire game :- या लोकप्रिय  गेमवर भारतात बंदी घालण्यात आली आहे. 14 फेब्रुवारी रोजी इतर 53 अॅप्ससह त्यावर बंदी घालण्यात आली होती. बंदीची बातमी येण्यापूर्वीच हे अॅप Google Play Store आणि Apple App Store वरून हटवण्यात आले होते. आता सिंगापूरस्थित गेम डेव्हलपर गारेनाने या परिस्थितीवर एक निवेदन जारी केले आहे, कंपनीने निवेदनात म्हटले … Read more

कर्जत नगरपंचायतीमध्ये महिलाराज! नगराध्यक्षपद राष्ट्रवादीकडे तर उपनगराध्यक्षपद काँग्रेसकडे

अहमदनगर Live24 टीम,  16 फेब्रुवारी 2022 :-  कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचे उषा राऊत यांची तर उपनगराध्यक्षपदी काँग्रेसच्या रोहिणी घुले यांची बिनविरोध निवड झाली आहे. दरम्यान याबाबतची माहिती पीठासीन तथा प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांनी दिली आहे. कर्जत नगरपंचायतीमध्ये दोन्ही पदाधिकारीपदी महिलांची निवड झाली आहे. यामुळे कर्जत नागरपंचायतवर “महिलाराज” निर्माण झाले आहे. कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी … Read more