धक्कादायक! महिलेच्या तोंडाला कापड बांधून डोक्यात टाकला दगड

अहमदनगर Live24 टीम,2 ऑगस्ट 2020 :-  संगमनेर तालुक्यातील नांदूर खंदरमाळ येथे महिलेच्या तोंडाला कापड बांधून डोक्यात दगड टाकून गंभीर जखमी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी चौघांवर घारगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारभारी मुरलीधर भागवत, आदिनाथ कारभारी भागवत, शिवा व त्याचा जोडीदार या चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. अधिक माहिती … Read more

पत्नी समोरच कीटकनाशक औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न

अहमदनगर Live24 टीम,2 ऑगस्ट 2020 :- विवाहित तरुणाने आपल्या राहत्या घरी स्वतःच्या पत्नी समोरच कीटकनाशक औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली. हा प्रकार काल (शनिवार) दुपारी श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे (आठवाडी) याठिकाणी घडला. या तरुणाला तात्काळ श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. सदर तरणाने विष प्राशन का केले याचे कारण अद्याप समजू शकले … Read more

भंडारदरा धरण ‘इतके’ भरले

अहमदनगर Live24 टीम,2 ऑगस्ट 2020 :- सध्या मान्सूनने अहमदनगरमधील पाणलोट क्षेत्रात सर्वदूर हजेरी लावली आहे. सातत्याने पडणाऱ्या पावसाने अनेक जलसाठे भरण्याच्या मार्गाकडे आहेत. पाण्याची आवक सुरु असल्याने नगर जिल्ह्यासाठी वरदान असणारे भंडारदरा धरणामध्ये पाण्याची आवक वाढत चालली आहे. भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी आहे. असे असले तरी यावर्षी धरणात पाणीसाठा शिल्लक होता. दोन … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पैसे मागितल्याने एकाची हत्या

अहमदनगर Live24 टीम,2 ऑगस्ट 2020 :-व्याजाचे पैसे मागितल्याचा रागातून एकाची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार अकोले तालुक्यात उंचखडक खुर्द येथे घडला आहे. यासंदर्भात अकोले पोलीस ठाण्यात हत्या व एट्रोसिटी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुकाराम बुधा उघडे ( वय 62,रा.उंचखडक खुर्द) असे मृताचे नाव असून कैलास यशवंत घोडके (वय 45,रा.उंचखडक खुर्द) असे आरोपीचे नाव आहे. … Read more

सराईत गुन्हेगाराने पोलिसाला चावा घेत पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि…

अहमदनगर Live24 टीम,2 ऑगस्ट 2020 :-संगमनेर तालुक्यात अनेक गुन्ह्यात फरार असलेला साकूर-माळवाडी येथील सराईत गुन्हेगाराने पोलिसाला चावा घेत पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेत त्याला गजाआड केले. ही घटना शुक्रवारी पहाटे साकूर-माळवाडी येथे घडली. नवनाथ विजय पवार असे त्याचे नाव आहे. जुन्नर, मंचर, आळेफाटा पोलिस हद्दीत अनेक गुन्ह्यात फरार असलेल्या पवारला ताब्यात … Read more

कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तीला पुन्हा कोरोनाची लागण !

अहमदनगर Live24 टीम,2 ऑगस्ट 2020 :-अकेाले तालुक्यात शनिवारी ९ पॅाझिटिव्ह आढळल्याने रुग्णांची एकूण संंख्या १३० झाली आहे. कारखाना रोड परिसरातील ५० वर्षीय व्यक्तीचा खासगी प्रयोगशाळेतील अहवाल पॅाझिटीव्ह आला. काही दिवसांपूर्वी कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तीला पुन्हा बाधा झाली आहे. शेरणखेल येथे ४, रेडे येथील ३, टाहाकारी व कारखाना रोड प्रत्येकी १ असा ९ जणांचा अहवाल पॅाझिटिव्ह आला. … Read more

अहमदनगर जिल्ह्यात २४ तासांत कोरोनाचे ५३५ नवे रुग्ण,सहा जणांचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,2 ऑगस्ट 2020 :- नगर शहर व जिल्ह्यात २४ तासांत कोरोनाचे ५३५ नवे रुग्ण आढळून आले. मागील पाच महिन्यांत सर्वाधिक रुग्ण प्रथमच शनिवारी आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या ५५०८ झाली आहे. जिल्ह्यात आणखी सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे बळींची एकूण संख्या ७४ झाली आहे. नगर शहरात १४ मार्चला पहिला रुग्ण आढळून आला … Read more

राज्यातील सरकार झोपलेले असल्याने शेतकऱ्यांच्या समस्या वाढल्या

अहमदनगर Live24 टीम,2 ऑगस्ट 2020 :-  दूध दरवाढीबाबत वारंवार मागणी करूनही राज्यातील आघाडी सरकारला जाग येत नाही. त्यामुळे रस्त्यावर उतरण्याची वेळ आली. दुधाच्या भाववाढीबरोबरच १० रुपये प्रतिलिटर अनुदान द्या; अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी शनिवारी दिला. सकाळी ११ वाजता नगर-मनमाड मार्गावरील बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर भाजप व रासपच्या वतीने दूध दरवाढीसाठी … Read more

जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात पालकमंत्री अपयशी

अहमदनगर Live24 टीम,2 ऑगस्ट 2020 :- जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात पालकमंत्री अपयशी ठरले आहेत, अशी टीका विखे पाटील यांनी केली आहे. दूध दरवाढ आंदोलकांवर गुन्हे दाखल करून आंदोलन चिरडण्याचा सरकारकडून प्रयत्न चालू आहे, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केला. शेतकऱ्यांच्या हितासाठी यापेक्षा तीव्र आंदोलन करू, असा इशाराही खासदार विखे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : इमारतीवरून उडी घेत तरुणीची आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम,2 ऑगस्ट 2020 :- संगमनेर शहरातील गणेशनगरमधील मोरया अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या १७ वर्षीय तरुणीने तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी १० वाजता घडली. हर्षदा मिलिंद इंगळे असे तिचे नाव आहे. हर्षदाने नुकताच बारावीत प्रवेश घेतला होता. वडील मिलिंद इंगळे भंडारदरा जलविद्युत केंद्रात काम करतात. शनिवारी सकाळी हर्षदाने बिल्डिंगच्या तिसऱ्या मजल्यावर … Read more

ब्रेकिंग : माजी नगरसेवक दिगंबर ढवण यांच हदय विकाराच्या झटक्याने निधन

अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :- माजी नगरसेवक दिगंबर ढवण यांचे हदय विकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक ते उपशहरप्रमुख व नंतर नगरसेवक असा त्यांचा राजकीय प्रवास होता. शिवसेनेचे माजी नगरसेवक दिगंबर ढवण (वय ४३) यांचं आज (दि, १) ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. संध्याकाळी ते फिरायला गेले आणि फिरुन आल्यानंतर त्यांना … Read more

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक

अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :- राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मातोश्री शारदाताई अंकुशराव टोपे (वय ७४) यांचे आज रात्री दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यावर गेल्या महिन्याभरापासून बॉम्बे हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू होते. त्या कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ साखर कारखान्याच्या अध्यक्ष होत्या, त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, जावई, सुन, नातवंडे असा परिवार आहे.  त्यांच्यावर उद्या रविवार दि. … Read more

छे ! छे ! हवेतून कोरोनाचा फैलाव नाही ! औरंगाबादचे सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ. रंजन गर्गे यांचा दावा!

अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :- वृत्तसंस्था कोरोना कसा होतो, आणि त्याचे विषाणू शरिरात कोठून कोठून प्रवेश करतात, याविषयी आतापर्यंत अजब माहिती आपण ऐकली असेल. त्यातच कोरोना हवेतून होतो, अशी माहिती पुढे आली आणि सर्वांच्या तोंडचे पाणी पळाले. मात्र या भितीदायक माहितीमध्ये काहीच तथ्य नसून कोरोनाचा फैलाव हवेतून होत नाही, असा दावा औरंगाबादचे सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ. … Read more

अँड्रॉइड मोबाईल वापरणाऱ्यांना खुषखबर! ‘हे’ मोबाईल झाले स्वस्त!

अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :- आज काल मोबाईल फोन हा जीवनाचा अविभाज्य घटक झालाय. एवढंच नाही तर तो प्रत्येकाच्या घरातला सदस्य झालाय. कारण या मोबाईलला काही बिघाड झाल्यास संपूर्ण घरवर एकप्रकारे शोककळा पसरते. त्यातल्या त्यात या अँड्रॉइड मोबाईल्सच्या किंमती वाढल्याने आर्थिकदृष्ट्या अत्यंत गरीब असलेल्या माणसाला इच्छा असूनही हा मोबाईल विकत घेता येत नाही. मात्र … Read more

डॉक्टर नव्हे क्रूरकर्मा राक्षस! तब्बल केले १०० खून!

अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :-परमेश्वराने श्रीमंतांपासून ते गरिबांपर्यंत अशा सर्वांनाच वेदनेपासून दिलासा मिळावा, त्यांचा आजार बरा व्हावा, नवीन आजार होऊ नये, यासाठी या सर्वांची प्रतिकारशक्ती वाढावी, यासाठी आयुर्वेदाच्या माध्यमातून वैद्य निर्माण केले. पुढे अनेक पॅथी आल्या आणि ऍलोपॅथीने या क्षेत्रात जम बसविला. यातून निर्माण झालेले डॉक्टर सामान्यांची सेवा करायला लागले. मात्र या क्षेत्रात डॉक्टरांप्रमाणेच … Read more

दूध संघ राष्‍ट्रवादीच्‍या ताब्‍यात असल्‍यानेच शेतकऱ्यांची पिळवणूक

अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :-युती सरकारने नाईलाजाने दूध उत्‍पादकांना ५ रुपयांचे अनुदान दिल्‍याचे सांगितले जात आहे. आता महाविकास आघाडीने ईलाज म्‍हणून १० रुपयांचे अनुदान देवून दाखवावे. राज्‍यातील दूध संघ हे कॉंग्रेस राष्‍ट्रवादीच्‍या ताब्‍यात असल्‍यामुळेच शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक होत असल्याचा आरोप शेतकरी नेते संतोष रोहोम यांनी केला. भारतीय जनता पक्षाच्‍या वतीने कोल्‍हार घोटी मार्गावर … Read more

कोपरगावमध्ये करोनाचा कहर : बधितांचा आलेख वाढताच !

अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :-कोपरगावमध्ये करोनाचा कहर वाढतच चालला आहे. शहरात काल सापडलेल्या रुग्णांच्या संपर्कातील ५२ व्यक्तीची रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात आली आहे. यामध्ये ११ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले तर ४१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर खाजगी लॅबमध्ये एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आज दुपारपर्यंत एकूण १२ बाधीत आढळले आहे. तसेच ३० … Read more

सरकारमधील मंत्रीच अनुदान लाटतात : राधाकृष्ण विखे पाटील यांची टीका

अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :- महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे दूध संघ असून स्वतःचे फायदे व्हावेत, दूध संघाला नफा मिळावा आणि अनुदान देण्यापेक्षा अनुदान लाटण्याचे काम मंत्री करत असल्याचा आरोप भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली राहाता येथे दुध दरवाढीसाठी आसूड आंदोलन करण्यात आले होते. यावेळी माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के, गणेशचे … Read more