पालकमंत्र्यांच्या भेटीनंतर आता अण्णा हजारे म्हणतात…

अहमदनगर Live24 टीम,25 जुलै 2020 :- ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याच्या कार्यपध्दतीवरून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. याच पार्श्वभूमीवर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज ज्येष्ठ सामाजिक नेते अण्णा हजारे यांची राळेगणसिद्धी येथे शुक्रवारी भेट घेतली. ग्रामपंचायतीवरील प्रशासक नियुक्तीच्या कायद्यासह लोकसहभागातून ग्रामविकास व समृद्ध खेडी या विषयांवर यावेळी दोघांमध्ये चर्चा झाली. दुपारी तीन … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आज ४४ रुग्णांची कोरोनावर मात !

अहमदनगर Live24 टीम,25 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ४४ रुग्णांची कोरोनावर मात.बरे झालेल्या रुग्णांची संख्या:१४८० अकोले ०१, कर्जत ०१, नगर ग्रामीण ०२, नगर शहर ११, पारनेर ०२, पाथर्डी ०१, संगमनेर १०, राहाता ०७, श्रीगोंदा ०७, श्रीरामपूर ०२ अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा  [email protected]

‘ह्या’तालुक्यात जोरदार पाऊस; बाजरी, भुईमूग पिके झाली भूईसपाट

अहमदनगर Live24 टीम,25 जुलै 2020 :- कोरोना महामारीने शेतकऱ्यांना कोलमडून टाकले आहे. त्यानंतर सोयाबीन बियाणांमध्ये झालेली फसवणूक, शेम्बडी गोगलगायीचे संकट आदी नैसर्गिक संकटांनी शेतकरी आणखी कोलमडला. परंतु त्याच्या पाठीशी लागलेले शुक्लकाष्ट संपण्याचे नाव घेत नाही. गुरुवारी संगमनेर तालुक्यातील घारगाव, अकलापूर, बोरबन, खंदरमाळ येथे मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे येथील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. रात्रभर … Read more

भिंगार छावणी परिषदेतील ‘ह्या’ अधिकाऱ्यास झाला कोरोना

अहमदनगर Live24 टीम,25 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घालण्यास सुरवात केली आहे. ग्रामीण भागातही कोरोनाने शिरकाव केल्याने चिंता वाढली आहे. अहमनगर शहरात तर कोरोनाचे दररोज दोन अंकी रुग्ण सापडत आहेत. कोरोनाने शासकीय कार्यालयात आपला विळखा घालण्यास सुरवात केली आहे. आता शहरातील भिंगार छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार यांना कोरोनाची लागण … Read more

संतापजनक : कोरोना रुग्णाचा ६ तास प्रवास…

अहमदनगर Live24 टीम,25 जुलै 2020 :- महापालिका रुग्णालयात सेवा देणाऱ्या एका कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा झाली. रुग्णालयात दाखल करण्यासाठी नातेवाईकांनी संपर्क करूनही रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. त्यामुळे रुग्णाला छत नसलेल्या टेम्पोत ठेवून रुग्णालयात नेण्यात आले, परंतु खाटा शिल्लक नसल्याचे कारण देत रुग्णालयांनी त्यांना नकार दिला. दुपारी बारापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत रुग्णाला दाखल करण्यासाठी नातेवाईकांचा आटापिटा सुरूच … Read more

..यामुळं डोक्यावरचे केस कमी झालेत; मुख्यमंत्री ठाकरे म्हणतात,,,

अहमदनगर Live24 टीम,25 जुलै 2020 :- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुलाखतीनंतर आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली आहे. सामनासाठी घेतलेल्या या मुलाखतीचा प्रसिद्ध करण्यात आला आहे, या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकार आणि भाजपावर घणाघात केला आहे. तसेच अनेक ध्येयधोरणे स्पष्ट केले आहेत. मुलाखतीच्या सुरुवातीला संजय राऊत यांनी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : माजी नगराध्यक्षांना कोरोनाची बाधा

अहमदनगर Live24 टीम,25 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यासह शिर्डीत करोनाने शिरकाव केला असून शहरात करोनाची शतकाकडे वाटचाल होताना दिसून येत आहे. दरम्यान साईंच्या नगरीत माजी नगराध्यक्षांना कोरोनाची बाधा झाली आहे.  करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आला, त्यानंतर गेली चार महिने आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असलेल्या शिर्डी साईनगरीत औषधालाही करोनाचा रुग्ण आढळून आला नाही. त्यामुळे शिर्डी शहरातील … Read more

शरद पवार यांच्या ‘त्या’ वक्तव्याचा भाजपकडून निषेध

अहमदनगर Live24 टीम,25 जुलै 2020 :- संसदेत शपथ घेत असताना खासदार उदयनराजे भोसले ‘जय भवानी जय शिवाजी’ म्हटल्याबद्दल भाजपचे व्यंकय्या नायडू यांनी आक्षेप घेतला म्हणून शिवसेनेने निषेध नोंदवला. दुसरीकडे श्रीराम मंदिर निर्माणाने कोरोना जाईल का, असा प्रश्न राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विचारून रामभक्तांच्या भावना दुखावल्या म्हणून श्रीरामपूर भाजपने गुरुवारी आंदोलन केले. ‘जय श्रीराम’ लिहिलेली … Read more

विहिरीत पडून शेतकऱ्याचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,25 जुलै 2020 :- राहुरी तालुक्यातील मांजरी येथील विहिरीत पडलेल्या पांडुरंग महानोर वय ५५ या शेतकऱ्याचा मृतदेह ९ तासांच्या अथक प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात आला. तालुक्यातील मांजरीच्या मुळा नदीपात्रालगत असलेल्या ग्रामपंचायतीच्या पुरातन विहिरीत शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. पांडुरंग महानोर हे पाय घसरून विहिरीत पडले होते. या घटनेची खबर परिसरात पसरल्याने गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव … Read more

पारनेर तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे शतक

अहमदनगर Live24 टीम,25 जुलै 2020 :- पारनेर तालुक्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येने शतक गाठले आहे. न्यायालयातील कर्मचाऱ्यास कोरोना संसर्ग झाल्याने न्यायालयापासूनचा शंभर मीटर परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. हा परिसर सील करण्याचे आदेश तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिले आहेत. तालुक्यातील १०० बाधितांपैकी ५२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. ४३ जणांवर उपचार सुरू आहेत. दुर्दैवाने … Read more

अजित पवार यांनी लवकरच मुख्यमंत्री व्हावे !

अहमदनगर Live24 टीम,25 जुलै 2020 :- उपमुख्यमंत्री असलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी लवकरच राज्याचे मुख्यमंत्री व्हावे, अशी अपेक्षा नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांनी व्यक्त केली.  पवार यांच्या वाढदिवसानिमित्त गुरूवारी संत लूक रुग्णालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जिल्हा ग्रामीण रुग्णालय व साखर कामगार रुग्णालयाला पीपीई कीट व अँटीजन टेस्टिंग कीट देण्यात आले. याप्रसंगी आदिक बोलत होत्या. … Read more

रिलायन्सची आणखी एक मोठी कामगिरी; टॉप -50 मध्ये आली कंपनी

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :-जगातील ५ व्या क्रमांकावर श्रीमंत असणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीजने आणखी एक विक्रम रचला. अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार मूल्य 13 लाख करोड़च्या पुढे गेले आहे. ही जगातील 48 व्या क्रमांकाची मूल्यवान कंपनी बनली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज ही देशातील क्रूड ऑईल, रिफायनरी, पेट्रोकेमिकल, रिटेल आणि टेलिकॉम क्षेत्रात काम करणारी … Read more

कोरोना ब्रेकिंग : आता ‘या’ ठिकाणी होणार घरोघरी कोरोना टेस्ट !

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :-वाढती कोरोना बाधितांची संख्या विचारात घेवून आरोग्य विभागाने शनिवारपासून पाथर्डी शहरात घरोघरी जावून ‘रॅपिड टेस्ट’ करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात प्रथमच धारावीच्या धर्तीवर मोठ्या प्रमाणात तपासण्या करण्यात येत असून, यासाठी तब्बत 25 पथके तयार करण्यात आली असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे यांनी दिली. पाथर्डी शहरात कोरोना बाधितांची … Read more

तर पैशांच्या वाट्यावरून डोके फुटतील !

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :- प्रशासक पक्ष वा पार्टीचा नसावा, अधिकारी कर्मचारी असावा हे घटना सांगते मी सांगत नाही. आमचे कायदे, न्यायालयाचे निकाल, राज्यपालांचे निवेदन या सगळयात पक्ष वा पार्ट्यांचा कोठेही उल्लेख नाही. अंमलबजावणीनंतर अर्धे समाधान होईल. पालकमंत्र्यास नेमणूकीचे अधिकार दिल्यास गावपातळीवर हाणामाऱ्या होतील. निवडणूकांमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्­न निर्माण होईल. वित्त आयोगाच्या पैशांच्या … Read more

शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहेत पीएम किसान योजनेचे पैसे ;तुम्हाला मिळणार कि नाही …

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :-केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी मागील वर्षी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना सुरू केली. या योजनेतून सरकार शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षाला ६ हजार रुपये देणार आहे. दोन हजार रुपयांच्या हफ्त्याने ही रक्कम दिली जाणार आहे. या योजनेचे दोन टप्पे पार पडले आहेत. या योजनेतून मिळणारे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक … Read more

अहमदनगर ब्रेकींग : दोन मुलांसह पित्यास जलसमाधी !

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :- नदीच्या पुरात एका 35 वर्षीय इसमासह त्याचा एक मुलगा व मुलगी वाहून गेल्याची दुर्दैवी घटना गेवराई तालुक्यातील पौळाचीवाडी येथील अमृता नदीवरील पुलावर गुरुवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान मुलीचा मृतदेह व त्यांची मोटारसायकल आढळून आली असून बाप-लेकाचा अद्यापही शोध सुरु आहे.  यासाठी बीड येथील फायरबिग्रेड पथकाला घटनास्थळी पाचारण … Read more

व्हॉट्सअ‍ॅपच्या ‘हे’फीचर्स तुमचे अकाउंट करेल अधिक सुरक्षित

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :-मेसेंजर अ‍ॅप व्हॉट्सअॅप असे एक अॅप आहे जे सर्व काम मिनिटभरात करते. व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून व्हिडिओ चॅटपासून होम शॉपिंग लिस्टपर्यंत आणि ऑफिसशी संबंधित गोष्टी, या अ‍ॅपद्वारे एकमेकांशी शेअर करतो. यासाठी आपले व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट सुरक्षित ठेवणे फार महत्वाचे आहे. यासाठी यात आधीपासूनच टू स्टेप वेरिफिकेशन हे फिचर आहे. हे फिचर अनेबल केल्यास … Read more

एफडीचे व्याजदर घटतायेत;’ह्या’ठिकाणी पैसे गुंतवणे होईल फायदेशीर

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक घडली विस्कटलेली आहे. देशाची आर्थिक घडी व्यवथित बसण्यासाठी पुन्हा काही कालावधी जाऊन द्यावा लागणार आहे. परंतु या काळात या कारणास्तव, आरबीआयने रेपो दर थोडा कमी केला आहे. परिणामी, देशातील बँकांनी कर्जाचे दर कमी केले, परंतु एफडी आणि बचत खात्यांवरील व्याज दर देखील कमी केले. येत्या काही … Read more