आनंदाची बातमी : २६ रुग्णांची आज कोरोनावर मात

अहमदनगर Live24 टीम ,8 जुलै 2020 : अहमदनगर जिल्ह्यातील २६ रुग्णांनी आज कोरोनावर मात केली आहे. आज 26 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यात, नगर मनपा १४, कोपरगाव ०३, पाथर्डी ०२, राहाता ०२, राहुरी ०४, श्रीरामपूर ०१. येथील रुग्णांचा समावेश आहे. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या: ४८१ उपचार सुरू: १९६ एकूण रुग्ण: ६९५ … Read more

इंदोरीकर महाराज म्हणाले मी महिलांविषयी …

अहमदनगर Live24 टीम ,8 जुलै 2020 :इंदोरीकर महाराज यांनी महिलांविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याचा आरोप करत भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई यांनी त्यांच्या उठवला होता. त्यामुळेमहाराजांच्या अडचणीत वाढ झाली होती. त्याच दरम्यान महाराजांच्या समर्थनार्थ अनेक ठिकाणी आंदोलनेही झाली. त्यानंतर तृप्ती देसाई यांनी कायदेशीर नोटीस इंदोरीकर महाराजांना पाठवली होती. त्या नोटीसला निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी उत्तर दिलं … Read more

थोडंसं मनातलं : कोरोना” आणि आता ‘निसर्ग वादळ’ देव अजुन किती परीक्षा पहाणार? … ॲड शिवाजी कराळे 

नमस्कार मित्रांनो  कोरोना नावाचा व्हायरस संपूर्ण देशभर थैमान घालतोय. देशभर अनेक लोक कोरोना संसर्गित असल्याचे समोर आले आहे. तसेच आपला महाराष्ट्र सुद्धा जवळपास दोन लाखाचे आसपास गेला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना ग्रस्तांसाठी संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वास्तविक ती संख्या कमी होईल अशी अपेक्षा होती. कोरोना प्रदुर्भाव टाळण्यासाठी अहमदनगर जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासन, महापालिका प्रशासन … Read more

थोरातांच्या मतदारसंघातील ‘या’ गावातील कोरोनाबाधितांचा आकडा ३८, पालकमंत्री आज देणार भेट !

अहमदनगर Live24 टीम ,8 जुलै 2020 :  संगमनेर तालुक्यातील कुरणमध्ये १० दिवसांत कोरोनाबाधितांचा आकडा ३८ वर गेली. मंगळवारी गाव सील करण्यात आले. दरम्यान, जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आज गुरुवारी कुरणला भेट देणार आहेत. संगमनेरमध्ये बाधितांची संख्या वाढत असून संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध सुरु आहे. सोमवारी रात्रीपासून १९ जुलैपर्यंत कुरण गावातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने … Read more

मंत्र्याच्या घरात कोरोनाचा शिरकाव !

अहमदनगर Live24 टीम ,8 जुलै 2020 :संगमनेर हा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा मतदार संघ. या ठिकाणी होत असलेल्या कोरोना विस्फोटाविरुद्ध ते लढा देत असतानाच राज्यातील परिस्थितीवरही त्यांचे लक्ष आहे. परंतु आता त्यांच्याच मुंबईतील बंगल्यात कोरोना पोहोचल्याने खळबळ उडाली आहे. त्यांच्या सरकारी निवासस्थानी काम करणाऱ्या टेलिफोन ऑपरेटरला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे बंगल्यावरील अन्य कर्मचारी आणि … Read more

विवाहितेची गळफासघेऊन आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम ,8 जुलै 2020 :श्रीरामपूर शहरातील प्रियंका विशाल नरोडे (२७) या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्या डॉ. नरवडे यांच्या पत्नी आहेत. बोरावके महाविद्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या अतिथी कॉलनीत हा प्रकार घडला. आत्महत्येचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही. अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] जॉईन व्हा आमच्या फेसबुक … Read more

सहकारमहर्षी काष्टी सोसायटीत एक कोटी 80 लाखांचा ‘गैरकारभार’ !

अहमदनगर Live24 टीम ,8 जुलै 2020 :भ्रष्टाचाराचे प्रमाण आणि आर्थिक गैरकारभाराचे प्रकार अनेक आर्थिक संस्थांमध्ये उघडकीस येत आहेत. असाच एक गैरकारभाराचा प्रकार सहकार महर्षी काष्टी सोसायटीमध्ये झाल्याचा आरोप होत आहे. एका माजी व्यवस्थापकाच्या कुटुंबातील सदस्यांच्या बोगस सह्या करून १ कोटी ८० लाखांच्या बोजाची नोंद शेतीक्षेत्रावर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तशी तक्रार माजी व्यवस्थापक … Read more

संतापजनक : डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘राजगृह’ह्या निवासस्थानाची तोडफोड

अहमदनगर Live24 टीम ,8 जुलै 2020 : डॉ. आंबेडकरांच्या मुंबईतील निवासस्थान असलेल्या ‘राजगृह’ निवासस्थानावर अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली आहे. संध्याकाळच्या सुमारास दोन माथेफिरुंनी हा प्रकार केलाय. यात त्यांनी घराबाहेरील CCTV चेही मोठे नुकसान केले आहे.आंबेडकर कुटुंबियांकडून घटनेचे CCTV फुटेज पोलिसांना देण्यात आले आहे. राजगृहाच्या खिडकीच्या काचाही फोडल्या तसंच घरातील कुंड्यांचीही नासधूस केली. पोलीस घटनास्थळी … Read more

कर्जमाफीसंदर्भात ‘त्या’ शेतकऱ्यांबाबत संभ्रम ; अडचणीत वाढ

अहमदनगर Live24 टीम ,8 जुलै 2020 :महाविकास आघाडी सरकारने राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना आखली. या योजनेद्वारे शेतकऱ्यांचे दोन लाखापर्यंत पीककर्ज सरसकट माफ केले. मात्र कर्जमाफीच्या निकषानुसार पात्र असणार्‍या अनेक शेतकर्‍यांना अद्यापही कर्जमाफी मिळाली नाही. ते पात्र की अपात्र याबाबत शासनाकडून कोणतीही स्पष्ट सूचना नसल्यामुळे अशा शेतकऱ्यांबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. … Read more

कोरोनाने साई संस्थानला ‘इतक्या’ कोटींचा फटका

अहमदनगर Live24 टीम ,8 जुलै 2020 : शिर्डीचे साईमंदिर हे भक्तांसाठी अमृततुल्य गोष्ट आहे. साईंचे भक्त जगभर आहेत. या ठिकाणी दर्शनाला येणाऱ्या भक्तांची संख्या अगणित आहे. परंतु सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साई मंदिर बंद आहे. अशातच गुरुस्थान मंदिरात रुद्रपूजा व साईमंदिरात दहीहंडी फोडून गुरुपौर्णिमेची सांगता झाली. या सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम साई दरबारी जमा होणाऱ्या देणगीवरही … Read more

‘त्या’ लोकप्रतिनिधीच्या संपर्कातील ‘त्यांचे’ अहवाल आले …

अहमदनगर Live24 टीम ,8 जुलै 2020 : मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आता याचा शिरकावं ग्रामीण भागातही झाल्याने संक्रमणाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. उत्तरतेतील एका लोकप्रतिनिधीस कोरोनाची बाधा झाल्यानंतर खळबळ उडाली होती. त्यानंतर श्रीरामपूर शहरात कोरोनाबाधित लोकप्रतिनिधीच्या संपर्कात आलेले ‘त्या’ नऊ राजकीय प्रतिष्ठांनी स्वतःहून रुग्णालयात जावून घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविले … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कोरोना संशयित रुग्णाचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम ,8 जुलै 2020 : वाळूज एमआयडीसीतून गावी सोनई येथे आलेल्या कामगाराचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचा संशय असल्याने प्रशासनाने तत्परता दाखवत त्याच्या संपर्कातील वीस जणांना क्वारंटाइन करत सर्वांचे स्त्राव तपासणीसाठी पाठवले. दरम्यान, मृत व्यक्तीने पाथर्डी तालुक्यातील एका लग्न समारंभास हजेरी लावली होती, अशी माहिती पुढे आली. सोनई येथील ५४ वर्षीय व्यक्ती वाळूज येथे कंपनीत … Read more

कोरोना ब्रेकिंग : दिवसभरात ४९ रुग्ण आढळले,जिल्ह्यातील रुग्णांची संख्या @६९५ !

अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 :  आज रात्री उशिरा बाधित आढळलेल्या रुग्णामध्ये अहमदनगर महापालिका क्षेत्रातील २१, जामखेड येथील ०२ (पुण्याहून प्रवास करून आलेले) आणि पारनेर तालुक्यातील लोणी मावळा (मुंबईहून प्रवास करून आलेला) एका रुग्णाचा समावेश. मनपा क्षेत्रात गवळी वाडा, कवडे नगर, ढवण वस्ती, नित्यसेवा(सावेडी), सिद्धार्थनगर आदी ठिकाणी बाधित रुग्ण आढळले. यात सर्वाधिक १२ रुग्ण … Read more

शरद पवार म्हणाले पारनेरमध्ये नगरसेवक फोडल्याचा मुद्दा….

अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 :  सध्या राज्यात पारनेर मधील नगरसेवकांचा शिवसेनेतून राष्टवादी कॉंग्रेस मध्ये केलेला प्रवेश चांगलाच गाजत आहे, याबबत शरद पवार यांनी आपले मत मांडले आहे. पारनेर हा फार लहान प्रश्न आहे. तो काही राज्यस्तरावर परिणाम करणार प्रश्न नाही, असं विधान शरद पवार यांनी पुण्यात केले आहे. त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री उद्धव … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात आज आणखी वाढले १६ कोरोना बाधित

अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 :   येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज रात्री १६ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये संगमनेर तालुक्यातील कुरण येथील ११ तर पेमरेवाडी येथील ०१, अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथील ०२ पारनेर तालुक्यातील पिंपळगाव येथील ०१ आणि राहाता तालुक्यातील दाढ बु. येथील एक रुग्ण बाधित आढळून आला … Read more

राज्यात आज वाढले ‘इतके’ कोरोना रुग्ण, जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यातील परिस्थिती

अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 :  राज्यात सलग पाचव्या दिवशी तीन हजारांपेक्षा जास्त रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ५४ टक्क्यांवर कायम असून आज ३२९६ रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत एकूण संख्या १ लाख १८ हजार ५५८ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ५१३४ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या … Read more

लागा तयारीला : राज्यात पोलीस खात्यात १० हजार जागा भरणार

अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 :राज्यातील कायदा-सुव्यवस्था भक्कम करण्याबरोबरच पोलीस दलावरील कामाचा ताण कमी करण्यासाठी राज्यातील पोलीस शिपाई संवर्गात दहा हजार तरुणांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला असून याचा फायदा शहरी व ग्रामीण तरुणांना होईल, त्यांना पोलीस दलात सेवेची संधी मिळेल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली. नागपूरमधील काटोल येथे राज्य राखीव … Read more

जिल्ह्यात ३३ टक्के क्षमतेनेहॉटेल्स, लॉजेस आणि गेस्ट हाऊस ८ जुलैपासून सुरु करता येणार

अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 :जिल्ह्यातील शॉपिंग मॉल्स वगळता हॉटेल्स, लॉजेस, गेस्ट हाऊस आदी आस्थापना त्यांच्या ३३ टक्के क्षमतेने विविध अटी व शर्तींचे काटेकोर पालन करुन दिनांक ८ जुलैपासून सुरु करता येतील, असे आदेश जिल्हा प्रशासनाने जारी केले आहेत. कन्टेन्मेंट झोन वगळता इतर ठिकाणी या आस्थापना सुरु करता येतील, असे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी … Read more