हृदयद्रावक ! मुलाने केली आत्महत्या; त्याच्या शवविच्छेदना दरम्यान पित्यानेही संपवली जीवनयात्रा

अहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 :कोपरगावात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. शिंगणापूर हद्दीतील संजीवनी कारखाना पेट्रोलपंपासमोर स्टेशन रोडवर राहणाऱ्या मुलाने मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास याने आपल्या घरात आत्महत्या केली. त्यानंतर दुःखात बुडालेल्या त्याच्या वडिलांनी शनिवारी पहाटे दोनच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. राहुल संजय फडे (27) आणि संजय रंगनाथ फडे (50) अशी मृतांची नावे आहे. … Read more

श्रीरामपूरमध्ये दोघांना कोरोना ; एकूण रुग्णसंख्या २२ वर

अहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 :अहमदनगर शहरासह जिल्ह्यात झपाट्याने कोरोनाचा प्रसार वाढत आहे. आता याचे लोन ग्रामीण भागातही पसरत चालले आहे. आज आलेल्या अहवालानुसार श्रीरामपूर शहरातील एका ४२ वर्षीय व्यक्ती व अशोकनगर येथील २३ वर्षीय युवकाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे श्रीरामपुर तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या २२ झाली असून तिघांचा मृत्यू झाला. तर ३५ … Read more

मुंबईहून आलेल्या नागरिकांकडून ग्रामसेवकाला धक्काबुक्की

 अहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 : मुंबईतील घाटकोपरहून संगमनेर तालुक्यातील कुरण येथे आलेल्या नागरिकांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवल्याचा राग मनात धरून ग्रामसेवकाला शुक्रवारी (३ जुलै) शिवीगाळ, धक्काबुक्की केली. याप्रकरणी शुक्रवारी रात्री उशिरा शहर पोलीस ठाण्यात नऊ जणांविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात दोन अल्पवयीन मुले तर दोन महिलांचाही समावेश आहे. आमच्या … Read more

ब्राह्मणवाडा येथील आणखी दोघे बाधित; एकूण रुग्ण संख्या चारवर

अहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 :  अहमदनगर शहरासह जिल्ह्यात झपाट्याने कोरोनाचा प्रसार वाढत आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात ठेवून नागरिकांनी खबरदारीच्या उपाययोजनांचे पालन करणे आवश्‍यक असताना नागरिक बेपर्वाईने वागत असल्याचे दिसत आहे. आता याचे लोन ग्रामीण भागातही पसरत चालले आहे. अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथील कोरोना बाधितांच्या संख्येत आज ‘दोन’ने वाढ झाली आहे. बुधवारी दोन कोरोना … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आमदारांच्या पत्नीचा कोरोना रिपोर्टही पॉझिटिव्ह !

अहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 :  अहमदनगर जिल्ह्यातील एका आमदारांना कोरोनाची लागण झाली होती त्यांच्या पत्नीचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. नगर शहरातील सावेडी भागातील ६१ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज सकाळी या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला. अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]Read more

जिल्ह्यात आतापर्यंत ४०० रुग्ण कोरोनातून बरे

अहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 : १५ रुग्ण आज बरे होऊन घरी परतले. जिल्ह्यातील कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या आता ४०० झाली आहे. आज नगर मनपा ०९, नगर ग्रामीण ०४, संगमनेर आणि पारनेर प्रत्येकी ०१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या १६२ इतकी आहे, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ.बापूसाहेब गाडे यांनी … Read more

नियमांचे पालन करून ही महामारी हद्दपार करावी

अहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 : आमदार नीलेश लंके यांनी सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू मानून विकासात्मक व आरोग्याच्या दृष्टिकोनाने कामे चालू आहेत. कोरोनाला न घाबरता त्याचे संक्रमण रोखण्यासाठी उपाययोजना करून व नियमांचे पालन करून ही महामारी हद्दपार करावी, असे आवाहन आदर्शगाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले. शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत … Read more

‘युरिया खत ८ दिवसांत न मिळाल्यास आंदोलन’

अहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 : शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना येत्या ८ दिवसांत मिळाले नाही, तर कृषी विभागाच्या कार्यालयासमोर शेतकरी आंदोलन करतील, असा इशारा जनशक्तीचे अध्यक्ष शिवाजी काकडे यांनी दिला. तहसीलदार अर्चना भाकड व तालुका कृषी अधिकारी मरकड यांना युरिया खत त्वरित उपलब्ध करून द्यावेत म्हणून लेखी निवेदन देण्यात आले. यावेळी जगन्नाथ गावडे, वसंत गव्हाणे, संदीप … Read more

पांडुरंग कृपेने कोरोना महामारी लवकरच संपेल

अहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 :  सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र बंद आहे. शासनातर्फे विविध स्तरांवर उपाययोजना सुरू करून जनजीवन पूर्वपदावर आणण्याचे काम सुरू आहे. त्यात सर्वांचा सहभाग व संघटित प्रयत्न आवश्यक आहे. आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांनी पंढरपूरला वारीने न जाता घरातच विठ्ठल-रुख्मिणीची पूजा करून कोरोना संकट दूर करण्याचे साकडे घातले आहे. पांडुरंग हा सर्वांच्या भक्तीला … Read more

… त्यामुळे मी सांगेल तेच होणार आहे – आमदार निलेश लंके

अहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 : शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख उमा बोरुडे यांच्यासह पारनेर नगरपंचायतीच्या शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी शनिवारी बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. आमदार नीलेश लंके यांच्या या खेळीमुळे विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लागला. विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेचे अनेक नगरसेवक आमदार नीलेश लंके यांच्या संपर्कात होते. … Read more

अपयशी राज्य सरकारमुळे साथ आजारात महाराष्ट्र अव्वल

अहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 : तीन वेगवेगळ्या विचारांचे पक्ष एकत्र येऊन स्थापन केलेले तिघाडी बिघाडी झाल्यामुळे सरकार संभ्रमावस्थेत आहे. त्यात सरकारने कोरोनाच्या संकटात योग्य ते नियोजन न केल्यामुळे संकटाची मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. अपयशी सरकारमुळे साथीच्या आजारात महाराष्ट्राचा एक नंबर असल्यामुळे राज्याची अर्थव्यवस्था ढासाळली आहे, असा आरोप भाजपच्या प्रदेश सचिव माजी आमदार स्नेहलता … Read more

या तालुक्यात कोरोनाचा कहर; एकाच दिवशी सापडले 13 कोरोनाबाधित रुग्ण

अहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 :  संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी (६२), संगमनेर खुर्द (३९), गुंजाळवाडी (५१, विठ्ठलनगर), तर शहरातील रहेमत नगर (४३), श्रमिकनगर (५७) अशा १३ रुग्णांची उचांकी नोंद शनिवारी झाली आहे. १३ रुग्ण पुरुष असून सर्वांचा अहवाल एकाच दिवशी पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. कुरणमधील ११ ते ४० वयोगटातील ७ जण असून एक … Read more

भरधाव वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 : कोपरगाव तालुक्यातील बहादरपूर ग्रामपंचायत हद्दीत रहिवाशी असलेले सुरेश परशराम पाडेकर (वय ४५) हे सकाळी ७.१५ वाजेच्या सुमारास दूध घालण्यासाठी जवळके येथे सायकलवरून जात असताना धोंडेवाडी समोरून येणाऱ्या व वावीकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या हुंदाई क्रेटा (एमएच १७ बीएक्स ७२११) या कारने जोराची धडक दिल्याने सायकलस्वार जागीच ठार झाले. या घटनेने … Read more

आजोबाने केली नातवाची हत्या! ‘अशी’ लावली मृतदेहाची विल्हेवाट वाचा त्या दिवशी नक्की काय घडल …

अहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 :  अकोले तालुक्यातील चिचोंडी शिवारातील कृष्णवंती नदीत सापडलेल्या तरुणाच्या मृतदेहाचे गूढ उलगडले आहे. दारू पिण्यासाठी वारंवार पैसे मागत असल्याने ७० वर्षीय आजोबानेच स्वतःच्या नातवाचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार तपासात समोर आला.  प्रदीप सुरेश भांगरे (२५, रा. खिरविरे, ता. अकोला) असे या मृत तरुणाचे नाव आहे. कमलाकर हनुमंत डगळे (७०, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याने नगरसेवकावर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 :कोपरगाव पालिकेचे अपक्ष नगरसेवक मेहमूद सय्यद हे साथरोग प्रतिबंधात्मक कायदा अन्वये निर्गमित केलेल्या आदेशाचे, तसेच संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करून, विना मास्क, विना हेल्मेट, सोबत वाहनाची कागदपत्रे न बाळगता त्याच्याकडील मोटार सायकलवरून शहरातील डॉ. आंबेडकर चौकात फिरताना आढळल्याने कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी हेडकाॅन्स्टेबल राजू … Read more

कोरोनाबाधित मृतदेहाच्या या प्रवासाबद्दल बातमी वाचून तुम्हालाही धक्काच बसेल…

अहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 :  शुक्रवारी कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आलेल्या शहरातील प्रभाग दोनमधील ६० वर्षीय व्यक्तीचा पहाटे साडेचार वाजता नगर येथे सिव्हिल रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. कोरोना बाधित व्यक्तीचा मृतदेह नगर येथील जिल्हा रुग्णालय प्रशासनाने चक्क श्रीरामपूरला नेऊन कुटुंबियाच्या ताब्यात दिला. ही गंभीर चूक लक्षात येताच जिल्हा रुग्णालयाने कुटुंबीयांना मृतदेह परत नगर येथे … Read more

‘या’ कारणांमुळे बातमी देताना लपवावी लागते कोरोनाग्रस्तांचे नाव व इतर माहिती…

अहमदनगर Live24 टीम ,4 जुलै 2020 : जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. चीनच्या वुहान प्रांतातून निघालेल्या या व्हायरसने जगास जेरीस आणले आहे. भारतातही याचे संक्रमण वाढतच चालले आहे. महाराष्ट्रात कोरोना संक्रमणाचे प्रमाण लक्षणीय आहे. परंतु तुम्हाला माहित का ? कि कोरोनाचे वृत्तांकन करताना ज्या व्यक्तीला कोरोना झाला आहे त्याची ओळख लपवावी लागते. त्याचे नाव इतर … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : 4 जुलै 2020

अहमदनगर Live24 टीम ,4 जुलै 2020 : अहमदनगर जिल्ह्यात आज दिवसभरात ३३ रुग्णांचा कोरोनाचा चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.आज १६ व्यक्ती कोरोनातुन बरे होऊन घरी परतले. आज दिवसभरात ८७ व्यक्तींचा कोरोना चाचणी अहवाल निगेटीव्ह आला आहे.आज दुपारी २६ रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. आज सायंकाळी ७ रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. पारनेर तालुक्यातील ६ जणांना … Read more