त्या वैद्यकीय अधिकार्‍याकडून जिल्हा रुग्णालयातील कर्मचार्‍यांना त्रास देण्यास सुरुवात

अहमदनगर Live24 ,18 मे 2020 :-  कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात काम करणार्‍या कर्मचार्‍यांसाठी देण्यात आलेले संरक्षण कीट पळविणार्‍या निवासी वैद्यकीय अधिकार्‍याचे निलंबन करुन कारवाई करण्याच्या मागणीसाठी छावा क्रांतीवीर सेनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब काळे यांनी घरीच अन्नत्याग आंदोलन सुरु केले होते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रदिप मुरंबीकर यांनी शनिवार दि.16 मे रोजी नाशिक विभागीय आरोग्य उपसंचालकांचे … Read more

दारूड्यांकडून महिलेस मारहाण

अहमदनगर Live24 ,18 मे 2020 :- दारूच्या नशेत महिलेच्या घरासमोर येऊन शिवीगाळ करून लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करण्यात आली. भिंगारमधील इंदिरानगर झोपडपट्टीत शनिवारी (दि. 16) ही घटना घडली. याप्रकरणी कॅम्प पोलिस ठाण्यात विशाल साबळे, करण साबळे, सिदान साबळे (सर्व रा. भिंगार) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मारहाणीत रेणुका अविनाश भिंगारदिवे (वय 27, रा. इंदिरानगर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘ते’ 7 जण कोरोनामुक्त, जिल्हयात आतापर्यंत 49 रुग्णांची कोरोनावर मात !

अहमदनगर Live24 ,18 मे 2020 :- कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि आरोग्य यंत्रणा करत असलेल्या प्रयत्नांना यश आल्याचे चित्र दिसत आहे. आज जिल्ह्यातील एकूण ०७ जण कोरोनामुक्त झाले. संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथील या ०७ कोरोना बाधित रुग्णांना आज बूथ हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना मुक्त … Read more

कोरोनाचा पुण्यात कहर; एकाच दिवसात दोनशे नवे रुग्ण

पुणे महाराष्ट्रात कोरोनाचा कहर सुरूच असून मुंबई खालोखाल पुण्यातही कोरोनाचे जास्त रुग्ण सापडत आहेत. रविवारी दिवसभरात नव्या २०१ रुग्णांची नव्याने भर पडली आहे. हे बाब पुण्याची चिंता वाढवणारी आहे. सध्या रोज दीड हजार लोकांची तपासणी होत असल्याने रुग्ण संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. पुण्यात याआधी सर्वाधिक १६६ आणि त्यानंतर शनिवार २०२ रुग्ण सापडले होते. … Read more

पुण्यातील अभियंत्याने तयार केला कोरोनाला दूर ठेवणारा एअर प्रेशर हेडबँड

पुणेः कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी तज्ञ् अनेक उपायांचा अवलंब करत आहेत. मास्क, सॅनिटायझर आदी गोष्टींचा अवलंब केला जात आहे. आता पुण्यातील अभियंता व डॉक्टर्सने मिळून कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी पॉझिटिव्ह एअर प्रेशर हेडबँडची निर्मिती केली आहे. इंडस्ट्रीयल इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअर सुनीत दोशी आणि सिंहगड डेंटल कॉलेजचे प्राचार्य डॉ. समीर पाटील यांनी या अभिनव हेडबँडची निर्मिती केली आहे. हवेच्या … Read more

पुण्यातील रुग्णसंख्या चार हजारांवर;जाणून घ्या अपडेट्स

पुणे पुण्यात कोरोनाने आपला कहर सुरूच ठेवला आहे. लॉक डाऊन असूनही रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. पुण्यात एकूण रुग्णांची संख्या ४,०१८ झाली आहे. कोरोना रुग्णांच्या मृतांची संख्या २११ पर्यंत पोहोचली आहे. तसेच शहरातील फक्त ५३ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडले आहे. शहरातील खासगी; तसेच सरकारी रुग्णालयात गेल्या २४ तासांत ९ रुग्णांचा करोनाच्या संसर्गामुळे मृत्यू … Read more

नदीपात्रात आढळला महिलेचा मृतदेह

पिंपरी चिंचवड जवळील थेरगाव घाट येथे पवना नदीपात्रात एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. शुक्रवारी (१५ मे) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास हा मृतदेश आढळून आला असून मृत महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही. महिलेचे वय अंदाजे ४० ते ४५ वर्षे आहे. वाकड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पवना नदीपात्रात … Read more

धक्कादायक! पुण्यातून आलात, मग गावात ‘नो एंट्री’

पुणे सध्या लॉक डाऊनमध्ये अडकून पडलेल्या मजुरांना त्यांच्या मूळ गावी सॊडण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. परंतु पुण्यातील बिहारी मजुरांवर वेगळेच संकट आले आहे. ते पुण्यात असल्याने त्यांना त्यांच्या राज्याने प्रवेश नाकारला आहे. पुणे विभागातून विविध राज्यांत आतापर्यंत ६८ हजार ५५३ प्रवासी रेल्वेने रवाना झाले आहेत. त्यासाठी १७ मे पर्यंत एकूण ५३ रेल्वे धावल्या आहेत. मात्र, यात … Read more

कोल्हापूरमध्येही चिंताजनक वातावरण; एका दिवसात आठ जणांना कोरोनाची लागण

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरमध्येही चिंताजनक वातावरण तयार झाले आहे. कोल्हापुरात एकाच दिवशी ८ लोकांना कोरोनाची बाधा झाल्याचे उघड झाले आहे. एकूण रुग्णसंख्या आता ४४ वर गेली आहे. मुंबई,पुणे,सोलापूर आदी रेडझोन मधुन कोल्हापूरात येणा-यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना, गेल्या शनिवारीपासुन कोरोनाची ही येथे संख्या वाढत आहे. मुंबई आणि सोलापूर वरून कोल्हापूरात आलेल्या चौघांना कोरोनाची लागण झाल्याचे आज … Read more

तीनशे फुट खोल दरीत ऊडी मारून वृद्धाची आत्महत्या !

अहमदनगर Live24 ,18 मे 2020 :-संगमनेर तालुक्यातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चंदनापूरी घाटात असलेल्या तामकडा (शेनकडा) वरून ऊडी मारून वयोवृद्धाने आत्महत्या केली. दिलीप दगडू वाघ (वय 65, रा. गुंजाळवाडी) असे या वयोवृद्धाचे नाव आहे. दिलीप वाघ हे वयोवृद्ध गुंजाळवाडी याठिकाणी राहात होते. रविवारी सकाळी त्यांनी चंदनापूरी घाटात असलेल्या तामकडा यावरून आडीचशे ते तीनशे फुट खोल … Read more

ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांचं निधन

मुंबई, 18 मे : ज्येष्ठ साहित्यिक आणि रंगकर्मी रत्नाकर मतकरी यांचं काल मध्यरात्री निधन झालं. मुंबईतील सेवन हिल्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. धक्कादायक बाब म्हणजे मतकरी यांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचं समजतं आहे. मृत्यू त्यांचं वय ८१ होतं. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण साहित्य क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. मतकरी यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी प्रतिभा मतकरी, मुलगी सुप्रिया, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘ही’ दोन गावे बफर झोनमध्ये

अहमदनगर Live24 ,18 मे 2020 :- दौंड येथे आढळलेल्या अजून एका कोरोनाबाधित रुग्णामुळे श्रीगोंद्यातील बफर झोनची दोन गावे प्रतिबंधित क्षेत्रात आली आहेत. निमगावखलू व गार या दोन गावे सील करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दौंड येथील गांधी चौकातील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्या परिसरापासून तीन किलोमीटर अंतरावरील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र जाहीर केले गेले. … Read more

धक्कादायक : पारनेरमध्ये पुन्हा एकाचा मृत्यू,कारण मात्र अस्पष्ट !

अहमदनगर Live24 ,18 मे 2020 :-  पारनेर तालुक्यात श्वसनाचा त्रास होत असलेल्या एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने रविवार दि.१७ मे ला सायंकाळी दरोडी येथील तरुणास तत्काळ अहमदनगर ला हलविले होते. आज सोमवार दि.१८ मे ला शासकीय रुग्णालयात त्याच्या घशातील स्रावाचे नमुने घेण्यात आले. नमुने तपासणीसाठी पाठविण्यात असुन, उपचार चालु असताना उपचारा … Read more

कोरोना इफेक्ट; नर्स सोडून जातायेत नोकरी, आरोग्य विभागावर संकट

कोलकाता कोरोनाने संपूर्ण जगावर संकट ओढवलं आहे. आता आरोग्य विभाग कोरोनाशी झगडत आहे. पश्चिम बंगालमध्ये आता नवीनच संकट उभा राहील आहे. अनेक खासगी रुग्णालयांमधून 300 पेक्षा जास्त नर्सनी नोकरी सोडली आहे. त्यामुळे आरोग्य विभागावरच संकट ओढावलं आहे. आई वडिलांचा दबाव आणि सुरक्षेची चिंता हे नोकरी सोडण्याचे कारण असल्याचे काही नर्सने सांगितले आहे. कोलकात्यातील 17 खासगी … Read more

बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे;वाहतूक सुरळीत

मुंबई: करोना काळात अत्यावश्यक सेवा बजावत असतानाही कर्मचाऱ्यांच्या आरोग्य सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने आजपासून बेमुदत बंद पुकारला होता. परंतु महाव्यवस्थापकांच्या आवाहनानंतर अखेर हे आदोलन मागे घेण्यात आलं आहे. करोना संकटाच्या काळात बेस्ट कामगारांनी कामगार संघटनेला साथ देण्याऐवजी बेस्ट प्रशासनाला साथ दिली. ८० ते ९० टक्के कामगारांनी कामावर हजेरी … Read more

खळबळजनक ! बस स्थानकावर आढळला कोरोना रुग्णाचा बेवारस मृतदेह

अहमदाबमधील एका बस स्थानकावर खळबळजनक प्रकार घडला आहे. याठिकाणी एक बेवारस मृतदेह आढळला असून तो कोरोना ग्रस्त असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेप्रकरणी मृतांच्या नातेवाईकांनी पोलीस कर्मचार्‍यांना आणि रुग्णालयाच्या कर्मचार्‍यांना दोषी ठरवले आहे. राज्य सरकारने याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच 24 तासात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. मृत … Read more

बेस्ट कर्मचाऱ्यांचा लॉकडाऊनमध्ये जाण्याचा निर्णय

मुंबई मुंबईकरांवरील संकट वाढण्याची चित्रे आहेत. कारण बेस्ट कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून अत्यावश्यक सेवा न देता लॉकडाऊन मध्ये जाण्याचा निर्णय जाहीर केला आहे. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या डॉक्टर, नर्स , पोलीस कर्मचारी यांची ने आण करण्याचे काम बेस्ट कर्मचारी करत आहेत. परंतु त्यांची कोणतीही सुरक्षतेतीची काळजी प्रशासनाकडून घेण्यात आलेली नाही. मास्क सॅनिटायजर या गोष्टी पुरवठाही मुबलक प्रमाणात त्यांना … Read more

कोरोनाचा पुण्यात कहर; एकाच दिवसात दोनशे नवे रुग्ण

पुणे महाराष्ट्रात कोरोनाचा कहर सुरूच असून मुंबई खालोखाल पुण्यातही कोरोनाचे जास्त रुग्ण सापडत आहेत. रविवारी दिवसभरात नव्या २०१ रुग्णांची नव्याने भर पडली आहे. हे बाब पुण्याची चिंता वाढवणारी आहे. सध्या रोज दीड हजार लोकांची तपासणी होत असल्याने रुग्ण संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. पुण्यात याआधी सर्वाधिक १६६ आणि त्यानंतर शनिवार २०२ रुग्ण सापडले होते. … Read more