चिंताजनक! कोरोनमुक्त जिल्हे ठरतायेत व्हायरसचे हॉटस्पॉट

बंगळुरू देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. परंतु आता एक जिंताजनक बाब समोर आली आहे. जे जिल्हे कोरोनमुक्त होते ते जिल्हे व्हायरसचे हॉटस्पॉट ठरत आहेत. पब्लिक हेल्थ फाऊंडेशन ऑफ इंडियातील लाइफ कोर्स एपिडेमिओलॉजीचे प्रमुख प्राध्यापक गिरिधर आर बाबू यांनी या बाबत चिंता व्यक्त केली आहे. देशामध्ये कोरोना प्रकरणांमध्ये समानता दिसून येणार नाही. या जागतिक महासाथीशी लढण्यासाठी … Read more

दुचाकी – चारचाकीच्या धडकेत पती-पत्नीचा मृत्यू

इंदापूर दुचाकीस चारचाकीने पाठीमागून धडक दिल्यामुळे पती-पत्नीचा मृत्यू झाला. हा अपघात पूणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर लोंढे वस्ती गागरगाव (ता. इंदापूर) येथे घडला. सुवर्णा दुपारगुडे, दयानंद दुपारगुडे अशी मृतांची नावे आहेत. वैभव दुपारगुडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञाताविरोधात इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे. फिर्यादी व त्यांचे चुलते व चुलती, नात हे दुचाकीवर (क्रमांक एम एच 12 केएफ 5535) … Read more

BREAKING : ‘त्या’ कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू

अहमदनगर Live24 ,18 मे 2020 :-  बीड जिल्ह्यात आढळलेल्या मात्र मुळच्या अहमदनगर जिल्ह्याच्या असलेल्या 7 कोरोनाग्रस्तापैकी एका 65 वर्षीय महिलेचा बळी गेला आहे. कोरोनामुळे बळी गेलेला बीड जिल्ह्यातील हा पहिला रुग्ण आहे. जिल्हा रुग्णालयातील विश्वसनीय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या महिलेचा आज (दि. 18) पहाटे तीनच्या सुमारास मृत्यू झाला. हे सात जणांचं कुटुंब मुंबईहून बीड जिल्ह्यात … Read more

गडचिरोली: नक्षलवादी चकमकीतील शहिदांना पोलीस प्रशासनाकडून मानवंदना

गडचिरोली : भामरागड तालुक्यातील कोठी हद्दीतील पोयरकोटी कोपर्शी जंगलात नक्षलवाद्यांबरोबरच्या चकमकीत शहीद झालेल्या पोलिसांना राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जैसवाल यांनी श्रद्धांजली वाहिली. शहीद झालेल्यांमध्ये पोलीस उपनिरीक्षक धनाजी होनमने (वय 29) व पोलीस शिपाई किशोर आत्राम (वय 30) यांचा समावेश आहे. धनाजी होनमाने यांना नुकतेच नक्षलविरोधी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी पोलीस महासंचालक पदकाने सन्मानित करण्यात आले होते. या … Read more

भुसावळहून मजुरांना घेऊन सहरशासाठी धावली श्रमिक एक्स्प्रेस!

जळगाव, दि. १६ –  कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अडकलेल्या परप्रांतीय प्रवाशांसाठी राज्य शासनाने स्वखर्चातून रेल्वे सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सुरुवातीला भुसावळातून लखनऊ व गोरखपूरसाठी विशेष गाडी सोडण्यात आल्यानंतर आज शनिवारी सायंकाळी 6.30 वाजता प्लॅटफार्म क्रमांक सातवरून 01857 भुसावळ-सहरशा (बिहार) एक्स्प्रेस रवाना झाली. या गाडीत जळगाव जिल्ह्यासह धुळे, नंदुरबार व बुलढाणा … Read more

दिल्लीत अडकलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांचे विशेष रेल्वेने भुसावळ येथे आगमन

 जळगाव, दि. १७ : दिल्लीहून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना घेऊन निघालेली विशेष रेल्वे आज दुपारी भुसावळ रेल्वे स्थानकावर आली. या रेल्वेने राज्यातील १ हजार ३४५ विद्यार्थ्यांचे आगमन झाले. यापैकी १९ जिल्ह्यातील ३६९ विद्यार्थी भुसावळ रेल्वे स्थानकावर उतरले. यावेळी या विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. दोन महिन्यांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर आपल्या राज्यात आल्याचा आनंद व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी ‘जय महाराष्ट्र’च्या घोषणा दिल्यात. … Read more

पालकमंत्र्यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा

अमरावती, दि. 17 : कोरोना साथीचे देश व राज्यावरील संकट संपविण्यासाठी लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ही साथ संपविण्यासाठी नागरिकांनीही दक्षता पाळून शासन- प्रशासनाच्या प्रयत्नांना साथ द्यावी, असे कळकळीचे आवाहन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले. पालकमंत्री ॲड. श्रीमती ठाकूर यांचा आज वाढदिवस होता. मात्र, … Read more

घरी रहा, कोरोनायोद्धा व्हा !

वर्धा, दि १७  :- सध्या जगभरामध्ये कोविड-19 या आजाराच्या साथीने थैमान घातले आहे. वर्धा जिल्ह्याच्या आजुबाजूचे सर्व जिल्हे डार्क रेड झोनमध्ये असताना देखील वर्धा जिल्हा प्रशासनाने अतिशय प्रयत्नपुर्वक नागरिकांच्या सहकार्याने वर्धा जिल्हा कोरोना मुक्त ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, सध्या कोरोनाबाधित जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात नागरिक येत आहेत. संपूर्ण कुटुंबाला गृह विलगिकरणात ठेवण्यात आले असतानाही अनेक लोक घराबाहेर निघत आहेत. 7 हजार … Read more

दिवसभरात २० हजार ४८५ ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा

मुंबई, दि.१७ : मद्यविक्रीसाठी सशर्त मंजुरी दिल्यानंतर राज्यात एकूण 10,791 किरकोळ मद्यविक्री अनुज्ञप्ती पैकी 4,713 अनुज्ञप्ती सुरू आहेत. आज दिवसभरात 20 हजार 485 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली. राज्य शासनाने 3 मे, 2020 पासुन लॉकडाऊन कालावधीत सीलबंद मद्यविक्री सुरु करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे जारी केलेली आहे. सदर  मार्गदर्शक … Read more

खासदार सुप्रिया सुळे यांची बदनामी केल्याप्रकरणी श्रीगोंद्यात गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 ,18 मे 2020 :- फेसबूकवर खा.सुप्रिया सुळे यांच्या फोटोसह आक्षेपार्ह पोस्ट टाकून बदनामी केल्याप्रकरणी विजय पवार याच्याविरुद्ध रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ऋषिकेश गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेल्या लॉकडाउनच्या काळात राज्यात सर्वत्र मद्यविक्री बंद होती. मध्यंतरी राज्य सरकारने काही शहरांत व ग्रामीण भागात मद्यविक्रीला … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : डॉक्टरच्या पत्नीची आत्महत्या

अहमदनगर Live24 ,18 मे 2020 :- अकोले तालुक्यातील कोतूळ येथील डॉ. रोहित भुजबळ यांची पत्नी अश्विनी (वय २७) यांनी रविवारी दुपारी साडेबारा वाजता राहत्या घरात आत्महत्या केली. या घटनेने खळबळ उडाली. डाॅ. भुजबळ यांचा विवाह चार वर्षांपूर्वी नवलेवाडी-माळीझाप येथील अश्विनी यांच्याशी झाला होता. त्या औषध निर्माण शास्रातील पदवीधर होत्या. पती, सासरे, सासू, दीर हे सर्व … Read more

धक्कादायक…. अहमदनगर जिल्ह्यातील एकाच कुटुंबातील सात जण कोरोनाबाधित !

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :- मुंबईहून आलेले एकाच कुटुंबातील ७ जण बीड जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. ते मूळचे अहमदनगर तालुक्यातील पिंपळगाव कौडा येथील रहिवासी आहेत. हे कुटुंब मुंबईहून थेट आष्टी तालुक्यातील सांगवी पठाण येथे नातेवाईकांकडे आले होते, दि. १४ तारखेला आल्यानंतर त्यांना शेतात क्वारंटाईन केले. २ दिवसांपासून त्यांना लक्षणे जाणवू लागली. बीड जिल्हा … Read more

मोठी बातमी : अहमदनगर जिल्ह्यातील ‘ही’ बाजारपेठ पुन्हा बंद करण्याचा निर्णय !

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :- मोठ्या कालावधीनंतर श्रीरामपूरची बाजारपेठ खुली झाली होती; मात्र त्यासाठी प्रशासनाने काही नियम घालून दिले होते; मात्र बाजारपेठ खुली झाल्यानंतर या नियमांचे पालन झाले नाही. त्यामुळे प्रशासनाने बाजारपेठ पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आल्यानंतर अत्यावश्यक सेवा सोडून सर्व दुकाने बंद होती. त्याप्रमाणे श्रीरामपूरची बाजारपेठही बंद होती. … Read more

…मग ते कार्यक्रम करतात, मंत्री तनपुरेंचा ‘त्या’ नेत्यास इशारा

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :-  पवार कुटुंबीय सभ्य, सुसंस्कृत आहे. मात्र टप्प्यात आल्यावर ते कार्यक्रमही करतात, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी माजी खासदार निलेश राणे यांना इशारा दिला आहे. तनपुरे यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हणले आहे की, ‘पवार कुटुंब सभ्य आहे. ते अभ्यासू तर आहेत. परंतु सुसंस्कृतही आहेत. मात्र, टप्प्यात आले तर कार्यक्रमही … Read more

अहमनगर करांसाठी आंनदाची बातमी !

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यातील ६ व्यक्तींचे घशातील स्त्राव तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठवले होते. त्यापैकी सहा अहवाल निगेटिव्ह आले आहेत. २ अद्याप प्रलंबित आहेत. दरम्यान आज जामखेड येथील कोरोना बाधीत रुग्ण कोरोनामुक्त झाला असून त्याला बूथ हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळाला. अहमदनगर  जिल्ह्यातील कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता … Read more

आज कोरोना रुग्णांच्या संख्येत सर्वाधिक वाढ,कोरोनाबाधितांची संख्या पोहोचली 33 हजारवर !

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :-  राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ३३ हजार ५३ झाली आहे. आज २३४७ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ६०० कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ७६८८ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या २४ हजार १६१ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले. आजपर्यंत … Read more

मोदी सरकारकडून सामान्य जनतेला दिलासा नाही

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :-  कोरोनाच्या संकटात हवालदिल झालेल्या जनतेला आर्थिक मदतीची तात्काळ गरज असताना मोदी सरकारने आर्थिक पॅकेजच्या नावाने जनतेची क्रूर थट्टा केली आहे. पॅकेजच्या नावातून मदत हा शब्द गायब केला असून हे आता कर्ज पॅकेज राहिले आहे. मोदी सरकारकडे जनतेला तात्काळ दिलासा देण्याकरिता कोणतीही ठोस योजना नसल्याने आता जनतेला तहान लागली असताना … Read more

दोन महिन्यांत शिर्डीत ‘हा’ एकही गुन्हा झाला नाही

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :-  कमी कष्टात जास्त पैसे कमावण्याची सवय असलेल्या गुन्हेगारी क्षेत्रातील तरुणांना घरातच राहाण्याची वेळ आली आहे. दोन महिन्यात शिर्डी शहरात एकही पाकिटमारीसारखी घटना घडली नाही. हे पहिल्यांदाच घडत आहे, असा सुर जागरूक नागरिकांनी व्यक्त केला आहे. कमी शिक्षण व समाजाच्या प्रवाहातून बाहेर फेकल्या गेलेल्या, वाईट संगतीने गुन्हेगारी क्षेत्रात पाय टाकलेल्या … Read more