काय ! कारमध्ये बसण्याचे महिन्याला ३ लाख

आज १२ – 13 घंटे काम करून जेमतेम पगार अशी बिकट अवस्था सध्या प्रायव्हेट सेक्टरची झाली आहे. परंतु जर तुम्हाला कार मध्ये बसण्याचे महिन्याला ३ लाख रुपये मिळाले तर? धक्का बसला ना! गुगलने केवळ कारमध्ये बसण्यासाठी दर तासाला १३०० रूपयांप्रमाणे भत्ता मिळविण्याची संधी देऊ केली आहे. ही संधी केवळ अॅरिझोनातील पदवीधरांनाच मिळू शकणार आहे. याचे … Read more

‘या’ मुलीला काल शिक्का मिळाला अन् तिच्या हाताची झाली ‘अशी’ दुरवस्था

मुंबईः सध्या कोरोनाने जगभर थैमान घातले आहे. त्यामुळे देशात लॉक डाऊन जाहीर केले. परंतु यामध्ये अनेक नागरिक विविध ठिकाणी अडकून पडले आहेत. मुंबईत अनेक चाकरमानी गल्लीबोळात छोट्याशा खोलीत राहत असल्यानं कोरोना संसर्गाची भीती आहे. त्यामुळे बरेच जण गावाला जायच्या मार्गावर आहे. पण गावी जाण्यासाठीही अनेकांना ई-पास घ्यावा लागतोय. त्यानंतर आरोग्य तपासणीकरून त्यांच्या हातावर शिक्का मारला … Read more

पत्नीने पती विरोधात केली तक्रार;कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क

एका पत्नीने आपल्या पतीविरोधात पोलिसांत तक्रार दिली आहे. परंतु याचे कारण मात्र विस्मयकारी आहे. या महिलेचा पती पंजाबमधील भटिंडावरून हरयाणातील हिसारमधील मूळ गावी आला होता. त्याने कोरोनाची चाचणी करण्यास नकार दिल्याने पत्नीने पोलिसांत तक्रार केली असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. संदीप हा काही दिवसांपूर्वीच पंजाब भटिंडा मधील तलवंडी येथून परतला होता. तो घरी आल्यानंतर … Read more

महत्वाची बातमी : राज्यातील लॉकडाऊन ‘या’तारखेपर्यंत वाढवला !

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :-  कोरोना व्हायरसनं देशात थैमान घातलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. या लॉकडाऊनचा तिसरा टप्पा आज संपतोय. दरम्यान केंद्र सरकारकडून मिळालेल्या संकेतानुसार १८ मेपासून ‘लॉकडाऊन ४’ ची सुरुवात होणार असून हा लॉकडाऊन ३१ मे पर्यंत चालणार आहे.  महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने महाराष्ट्र सरकारनं 31 मे … Read more

धक्कादायक ! पत्नी व मुलांवर गोळ्या झाडून सीआरपीएफ जवानाची आत्महत्या

एका सीआरपीएफ जवानाने पत्नी आणि आपल्या दोन मुलांवर गोळ्या झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये शनिवारी हा प्रकार घडला. विनोद कुमार यादव असे या सीआरपीएफ जवानचे नाव असून मुलाचे नाव संदीप आणि मुलीचे नाव सिमरन होते. अधिक माहिती अशी की, विनोद कुमार यादव हे सीआरपीएफमध्ये ड्रायव्हर म्हणून कार्यरत होते. ते आपली … Read more

जितेंद्र आव्हाड यांना धमकी…ते म्हणतात

मुंबई /प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड नेहमीच विविध गोष्टींमुळे नेहमीच चर्चेत असतात. आता त्यांना ट्विटरवर एका युजरकडून धमकी देण्यात आली आहे. यामध्ये जितेंद्र आव्हाड यांना उद्देशून म्हटले होते की, भिडे गुरुजी आणि मंडळी वाट बघत आहेत तुमची. त्यामुळे घराच्या बाहेर पडू नका, असे म्हटले होते. आता ते फारच संतापले असून आव्हाड यांनी याविरोधात कारवाई … Read more

संतापजनक ! नवजात मुलीला पोत्यात गुंडाळून फेकलं, पोलिसांनी वाचवलं

इंदौर कोरोना संकटाच्या काळात संपूर्ण देश एकजुटीने लढतो आहे. अनेक विधायक कामे करत नागरिकांनी आदर्श घालून दिला आहे. परंतु याच देशात काही अमानुष कृत्यही होत आहेत. शनिवारी (16 मे) ला एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका नवजात मुलीला तिचे पालक पोत्यात गुंडाळून सोडून गेले. त्या मुलीला अक्षरशः मुंग्या लागल्या होत्या. पोलिसांनी स्थानिक रहिवाशांच्या मदतीने … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : मजुरांना घेऊन जाणारी खाजगी बस उलटली

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :- पुणे येथून इलाहाबादकडे मजुरांना घेऊन जाणारी खासगी बस उलटून चार मजूर किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना नेवासा फाटा येथे आज पहाटेच्या सुमारास नगर-औरंगाबाद महामार्गावर घडली. रविवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास पिंपरी चिंचवड येथून ही बस उत्तरप्रदेश राज्यातील इलाहाबादकडे २६ मजुरांना घेऊन निघाली होती. सदर खासगी बस ( क्र … Read more

अहमदनगरच्या ‘या’ उद्योजकाला 5 कोटी 86 लाखांचा ‘चुना’

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :- नवी मुंबई येथील ईशकृपा शिपिंग अँड लॉजिस्टिक प्रा . लि ( खारघर ) या कंपनीचे संचालक व त्यांच्या साथीदारांनी आयात मालावरील कस्टम ड्युटी व जीएसटीच्या नावाखाली नगरच्या उद्योजकाला तब्बल ५ कोटी ८६ लाख ८३ हजार ८५० रुपयांचा चुना लावला. अहमदनगर एमआयडीसीतील जे.एम. इंडस्ट्रीज या कंपनीचे मालक निखिलेंद्र मोतीलाल लोढा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : 38 गुन्हे करणारा ‘हा’ वॉन्टेड आरोपी टोळीसह पोलिसांच्या जाळ्यात !

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :- पूर्वीचे 35 व आता लागोपाठ तीन गुन्हे असे एकूण 38 गुन्हा केलेला वॉन्टेड नाशिकच्या किरण उर्फ अॅन्थोनी छगन सोनवणे (वय ३२) याच्यासह त्याची टोळी नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केली आहे. दोन गावठी कट्ट्यांंसह सात जिवंत काडतुसे, दोन मोटारसायकली, 7 मोबाइल हँडसेट हस्तगत करण्यात आले आहेत. किरण उर्फ अॅन्थोनी … Read more

पंधरा दिवसांनी वाढू शकतो लॉकडाऊनचा चौथा टप्पा ;असे असेल नियोजन ..

नवी दिल्ली आज लॉकडाऊनचा तिसरा टप्पा संपणार आहे. मागे पंतप्रधानांनी जनतेशी साधलेल्या संवादावेळी त्यांनी चौथ्या टप्प्यात लॉकडाऊन असू शकते असे संकेत दिले होते. हा लॉकडाऊन 15 दिवसांचा असणार आहे अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. रविवारी रात्री याची घोषणा होण्याची शक्यता आहे. या लॉकडाऊनमध्ये अनेक सुविधा दिल्या जाऊ शकतात. उद्योग सुरू करण्याबाबात आणखी सुट मिळू … Read more

धक्कादायक! कोरोना मुक्त झालेल्या महिला डॉक्टरला शेजाऱ्यांनी घेतलं कोंडून

नवी दिल्ली कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभर प्रयत्न सुरु आहेत. या संकटात आरोग्य कर्मचारी दिवस रात्र झटत आहेत. परंतु या डॉक्टर्सना वाईट अनुभव ही आले आहेत. दिल्लीतील वसंतकुंज परिसरात कोरोनाची लागण झालेली महिला डॉक्टर ठणठणीत बरी होऊन परतल्यानंतर तिला सोसायटीवाल्यांनी घरात कोंडून घेण्याचा प्रयत्न केला तसेच तिला सोसायटी सोडायची धमकीही दिली. वसंत कुंज इथल्या डॉक्टर महिलेला … Read more

श्रमिक विशेष रेल्वे बलियाकडे रवाना

कोल्हापूर, दि. 16 (जिमाका) : उत्तरप्रदेशमधील बलियाकडे 1 हजार 456 श्रमिक विशेष रेल्वेने आज सायंकाळी 6 वाजता कोल्हापुरातून रवाना झाले. हे सर्व मजूर इचलकरंजी नगरपालिका क्षेत्रातील आहेत. भारत माता की जय ! छत्रपती शाहू महाराज की जय ! छत्रपती शिवाजी महाराज की जय ! अशा घोषणा देत या मजुरांना उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या. लॉकडाऊनमुळे आजअखेर जिल्ह्यात … Read more

गोरेगावच्या नेस्को विलगीकरण केंद्राची पालकमंत्री अस्लम शेख, आदित्य ठाकरे यांनी केली पाहणी

मुंबई, दि. १६ : मुंबईतील सर्वात मोठे प्रदर्शन केंद्र असणाऱ्या गोरेगाव येथील नेस्को मैदानावर उभ्या राहत असलेल्या देशातील सर्वात मोठ्या २६०० खाटांच्या कोरोना काळजी केंद्र २ ची राज्याचे वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय, बंदरे तथा मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख व मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी पाहणी केली. पालकमंत्री श्री.अस्लम शेख म्हणाले की, नेस्को प्रदर्शन केंद्रामध्ये ५ … Read more

एपीआय कै.अमोल कुलकर्णी यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई, दि. १६ : कोरोना विषाणूशी लढताना धारावी शाहूनगर पोलीस स्टेशनचे ए.पी.आय. अमोल कुलकर्णी यांचे दुर्दैवाने निधन झाले. धारावी येथील शाहूनगर पोलीस स्टेशन येथे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज या पोलीस योद्ध्यास श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी  शालेय शिक्षण मंत्री श्रीमती वर्षा गायकवाड, मुंबई पोलीस आयुक्त परमबिर सिंग, अपर पोलीस आयुक्त विनय चोबे उपस्थित होते. कोरोना … Read more

कोविड केअर, हेल्थ सेंटर, स्वॅब तपासणी, अलगीकरण, मनुष्यबळ सुविधांचा पालकमंत्री सतेज पाटील यांनी घेतला आढावा

कोल्हापूर, दि. 16 (जिमाका) : जिल्ह्यातील सद्य:स्थिती, कोव्हीड केअर सेंटर, कोव्हीड हेल्थ सेंटरमधील मनुष्यबळ, साधनसामग्री, अलगीकरणाबाबत नियमावली आदींबाबत पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज आढावा बैठक घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, शासक वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, जिल्हा शल्यचिकित्सक … Read more

दिवसभरात राज्यातील ८,२६८ ग्राहकांना घरपोच मद्यविक्री

मुंबई, दि. 15 : गर्दी टाळणे, संपर्क टाळणे व संसर्ग टाळणे या भूमिकेतून आजपासून सकाळी 10 वाजल्यानंतर घरपोच मद्यसेवा सुरू करण्यात आली. आज दिवसभरात राज्यातील 8,268 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री देण्यात आली असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली. मद्य सेवन परवाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. याशिवाय राज्य उत्पादन … Read more

‘या’ निर्णयामुळे शेतकरी आर्थिक संकटातून बाहेर पडेल

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :- जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून कांदा हटवल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटातून बाहेर पडेल, असा विश्वास शेतकरी नेते अनिल देठे यांनी व्यक्त केला आहे. केंद्र सरकारच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले. अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार कांद्याचे भाव वाढल्यामुळे कोसळले होते. त्यानंतर कांद्याचा जीवनावश्यक वस्तूूंमध्ये समावेश करण्यात आला. कांद्याचे बाजारभाव नियंत्रित ठेवण्यात केंद्र सरकारला यश … Read more